महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 6, 2019, 11:34 AM IST

ETV Bharat / state

नागपूर गोळीबारप्रकरणी 6 आरोपींना बेड्या

शहरातील कुख्यात गुंड लकी खानवर झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. पैशाच्या वादावरून ही घटना घडली असल्याचे तपासातून पुढे आले आहे.

प्रकरणाची माहिती देतांना निलेश भरणे, डीसीपी, गुन्हे शाखा नागपूर

नागपूर- शहरातील कुख्यात गुंड लकी खानवर झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. अटक केलेले सहाही आरोपी कुख्यात गुंड आहेत. पैशांच्या वादावरून ही घटना घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या लकी खानवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

प्रकरणाची माहिती देतांना निलेश भरणे, डीसीपी, गुन्हे शाखा नागपूर


दोन दिवसांपूर्वी नागपुराच्या मानकापूर परिसरात फायरिंगची घटना घडली होती. या घटनेत लकी खान नावाचा कुख्यात गुंड जखमी झाला होता. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. पैशाच्या वादातून ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे. लकी खान हा जेलमध्ये असताना त्याला सोडविण्यासाठी धर्म ठाकूर याने त्याच्या पत्नीला तीन लाख रुपये दिले होते. लकी बाहेर आल्यानंतर पैसे परत करणार होता. मात्र, त्याने पैसे परत केले नाही. याचा वचपा काढण्यासाठी नियोजन करून हा गोळीबार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. अटक केलेले सर्व आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून या गुन्ह्याशी संबंधीत आनखी काही गुण्हेगार समोर येण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details