महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 22, 2022, 3:49 PM IST

ETV Bharat / state

MP Navneet Rana Arrest Warrant : खासदार नवनीत राणांसह त्यांच्या वडिलांवर अटकेची टांगती तलवार; अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( Shivdi Court Directs Police to Produce MP Rana ) यांच्या जातपडताळणी प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने बजावला ( Navneet Rana Non Bailable Arrest Warrant ) होता. बुधवारी न्यायालयाने राणा यांना कुठलाही दिलासा न दिल्याने त्यांना व त्यांच्या वडिलांना अटक करण्याचे निर्देश संबंधित कोर्टाने पोलिसांना दिले ( Arrest Father Before Court Next Hearing on December 28 ) आहेत.

Shivdi Court Directs Police to Produce MP Navneet Rana Arrest Father Before Court Next Hearing on December 28
खा. नवनीत राणांसह त्यांच्या वडिलांवर अटकेची टांगती तलवार; अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

मुंबई :खासदार नवनीत राणा यांच्या जातपडताळणी प्रकरणात अजामीनपात्र अटक वाॅरंट शिवडी कोर्टाकडून जारी करण्यात ( Shivdi Court Directs Police to Produce MP Rana ) आला आहे. आज शिवडी कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान नवनीत राणा यांच्या वकिलांनी ( Arrest Father Before Court Next Hearing on December 28 ) न्यायालयात म्हटले की, नवनीत राणा लोकसभा अधिवेशन सुरू असल्याने हजर होऊ शकल्या ( Navneet Rana Non Bailable Arrest Warrant ) नाहीत. त्यांचे वडील तीर्थक्षेत्र दर्शनासाठी गेले आहेत. त्यावर न्यायालयाने म्हटले की, त्यांच्या वडिलांसह त्यांना न्यायालयासमोर हजर करा, असे निर्देश पोलिसांना दिले असल्याने राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

न्यायालयाने नवनीत राणांच्या वडिलांना कोर्टासमोर हजर करण्याचे निर्देश :खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस त्यांच्या विरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. मात्र, न्यायालयासमोर हजर न राहिल्याने पोलिसांनी त्यांना अटक करण्याचे निर्देश संबंधित कोर्टाने दिले होते. या प्रकरणात सत्र न्यायालयानेदेखील कुठलाही दिलासा राहणार नाही, आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. शिवडी महानगर न्यायालयात पुढील सुनावणी 28 डिसेंबर रोजी होणार आहे.


शिवडी कोर्टाचा सरकारी वकिलांना प्रश्न :खासदार नवनीत राणा जातप्रमाणपत्र पडताळणी प्रकरणात शिवडी कोर्टाने नवनीत राणांविरोधात जारी केलेल्या अजामीनपात्र वाॅरंटवर कारवाईसंदर्भात पोलिसांनी असमर्थता दाखवली आहे. सदर प्रकरण मुंबई सत्र न्यायालयात प्रलंबित असून, सरकारी पक्षाने राणांविरोधात कुठलीही कारवाई न करण्यासंदर्भात दिलेल्या हमीमुळे पोलीस पुढील कारवाई करण्यास असमर्थ आहेत, असे पोलिसांनी कोर्टाला सांगितले. महानगर दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश असताना सरकारी वकील त्यावर कारवाई न करण्यासंदर्भात भाष्य करण्याचा अधिकार आहे का? असे प्रश्न शिवडी कोर्टाने विचारला आहे.


खा. नवनीत राणा यांच्याविरोधात या कलमांखाली केला गुन्हा दाखल :खा. नवनीत राणा यांच्याविरोधात कलम 420, 468, 471 आणि 34 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवनीत आणि हरभजन सिंग, रामसिंग कुंडलेशिवाय तिचे वडीलदेखील या प्रकरणात आरोपी आहेत. नवनीत राणा यांच्यावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा केल्याचा आरोप आहे. अमरावती मतदारसंघ अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात राणा उर्फ ​​नवनीत कौर हरभजन सिंग कुंडलेस आणि तिचे वडील हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details