महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 12, 2021, 10:30 PM IST

ETV Bharat / state

'विकेंड लॉकडाऊन'मध्ये लोकल प्रवासी संख्येत विक्रमी घट

वाढत्या कोरोना रुग्णांनामुळे राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत निर्बंध घातले असून शनिवार-रविवारी वीकेंड लाॅकडाऊन घोषित केला असून विकेंड लाॅकडाऊनमध्ये मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता. यामुळे दररोज 70 लाख प्रवासी वाहणाऱ्या लोकलमधून दोन दिवसांत फक्त 5 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.

लोकल रेल्वे
लोकल रेल्वे

मुंबई- वाढत्या कोरोना रुग्णांनामुळे राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत निर्बंध घातले असून शनिवार-रविवारी वीकेंड लाॅकडाऊन घोषित केला होता. या दोन दिवसीय विकेंड लाॅकडाऊनमध्ये मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता. यामुळे दररोज 70 लाख प्रवासी वाहणाऱ्या लोकलमधून दोन दिवसांत फक्त 5 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.

विकेंड लॉकडाऊनमध्ये लोकल प्रवासी संख्येत विक्रमी घट

लोकलमध्ये शुकशुकाट

राज्य सरकारने कोरोनाचा संबंध नसलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के उपस्थिती, तर खासगी कार्यालयांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार गर्दीच्या दिवशी देखील लोकलमधील प्रवाशांची संख्या रोडावत आहे. मात्र, राज्य सरकारने वीकेंड लाॅकडाॅऊन लावल्यामुळे अनेक प्रवाशांनी लोकल प्रवास टाळला. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी आणि रविवारी प्रतिदिन सुमारे 4 लाख प्रवाशांनी प्रवास केला. पश्चिम रेल्वे मार्गावर शुक्रवारी 2 लाख 50 हजार प्रवासी संख्या होती. मात्र, शनिवारी-रविवार हीच प्रवासी संख्या सुमारे 1 लाख 20 हजारांवर आली, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. तसेच रविवारी देखील कमी प्रवासी संख्या असल्याचे दिसून आले.

लोकलमधील प्रवाशांची गर्दी रोडावली

कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर 1 फेब्रुवारीपासून राज्य सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांना पहिल्या लोकलपासून ते सकाळी 7, दुपारी 12 ते दुपारी 4 आणि रात्री 9 ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची मर्यादीत वेळ ठरविण्यात आली. यावेळेत सर्वसामान्य प्रवासी प्रवास करू शकत आहेत. लॉकडाऊनपूर्वी मध्य रेल्वेवर दररोज 45 लाख आणि पश्चिम रेल्वेवर 30 लाख, असे एकूण 75 लाखपेक्षा जास्त प्रवासी लोकलने दररोज प्रवास करत होते. अनलाॅक काळात सर्वसामान्यांन प्रवाशांना वेळेची मर्यादा घातल्याने लोकल प्रवासी संख्या कमालीची घटली आहे.

अशी घटली प्रवासी संख्या

पूर्वी सध्या मध्य रेल्वेवर 22 लाख प्रवासी लोकलमधून प्रति दिवस प्रवास करत आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर 16 लाख प्रति दिवस प्रवास करत आहे. मात्र, आता पुन्हा लाॅकडाऊनच्या धसक्याने परप्रांतीय मजुरांनी गावची वाट धरली आहे. त्यामुळे अनेक आस्थापनात जाणारे परप्रांतीय कमी झाले आहेत. परिणामी, मागील एका महिन्यांत पश्चिम रेल्वे मार्गावरील सुमारे 2 लाख 31 हजार प्रवासी संख्या कमी झाल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.तर, मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी संख्या 3 लाखांने कमी झाली आहे.

हेही वाचा -कोरोनामुळे 'लालपरी' तोट्यात, नऊ हजार कोटींहून अधिक तोटा

हेही वाचा -कोरोनाग्रस्तांसाठी रेल्वेचे 173 आयसोलेशन कोच तयार

ABOUT THE AUTHOR

...view details