महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 7, 2023, 8:40 PM IST

ETV Bharat / state

Ac Local Passengers मध्य रेल्वेवर एका दिवसात एसी लोकल प्रवाशांचा एक लाखाचा टप्पा पार, रेल्वेला झाले भरघोस उत्पन्न

वातानुकूलिकत लोकलने प्रवास ( One Lakh Passengers Travelled On Ac Local ) करणाऱ्या प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली आहे. 2 जानेवारीला वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तर उच्चांक केला आहे. एका दिवसात एक लाखाच्यावर प्रवाशांनी वातानुकूलित लोकलने प्रवास केला आहे. यामधून मध्य रेल्वेला भरघोस उत्पन्न मिळाले आहे.

Ac Local Mumbai
वातानुकूलिकत लोकल

मुंबई - एप्रिल 2022 पासून सहा महिन्याच्या काळामध्ये मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकल ट्रेनची ( One Lakh Passengers Travelled On Ac Local ) संख्या वाढवली गेली. आतापर्यंत सर्व मिळून एक करोड पेक्षा अधिक प्रवाशांनी या वातानुकूलित लोकलने प्रवास ( Ac Local Passengers ) केला. त्यामुळे मध्य रेल्वेने एक उच्चांक स्थापित केला आहे. मध्य रेल्वेला या प्रवाशांकडून भरघोस उत्पन्न झाले आहे. तसेच मध्य रेल्वेने एका दिवसात एक लाखाचा टप्पा पार केला आहे.

वातानुकूलित लोकलचे प्रवासी वाढलेमध्य रेल्वेने वातानुकूलित एसी लोकल ट्रेन सुरू केल्या. त्याला प्रवाशांचा सुरुवातीला पाठिंबा आणि प्रतिसाद कमी होता. त्यानंतर वाद देखील झाला. सर्वसाधारण लोकल ट्रेन वेळेवर येणे आणि त्याचे भाडे सर्वसामान्य जनतेला परवडण्यासारखा असते. त्यामुळे लोकल ट्रेन अधिकच्या चालवाव्या आणि त्याच मार्गावर वातानुकूलित ट्रेन चालवल्यावर सर्वसामान्य गाड्यांपासून जनता वंचित राहते. या संदर्भात आंदोलन झाले. मात्र वातानुकलीत लोकल ट्रेन काही कमी झालेल्या नाहीत. त्यांची संख्या वाढली आहे. वातानुकूलित ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील वाढली. त्यामुळे मध्य रेल्वेने सहा महिन्यांमध्ये एक करोड पेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला.

मध्य रेल्वेने तिकीट दरात केली कपातएसी लोकल यात्रा करण्यासाठी प्रवाशांना लाभ मिळावा या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने मे 2022 मध्ये दैनिक तिकिटाच्या भाड्यामध्ये 50 टक्के कपात केली. मध्य रेल्वेने सप्टेंबर 2022 मध्ये सर्वसाधारण ट्रेनच्या प्रथम श्रेणी त्र्यैमासिक अर्धवार्षिक आणि वार्षिक सीजन पाच काढणाऱ्यांना देखील यामध्ये प्रवेश करण्याची संधी दिली. जास्तीचे भाडे सुद्धा वजावट करण्याची सुविधा दिली. याचा परिणाम म्हणून सहा महिन्यांमध्ये मध्य रेल्वेवरील एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या एक लाख 664 इतकी झालेली आहे. तर एकूण सर्व सहा महिन्यांमधील सर्व प्रवाशांनी केलेल्या प्रवास हा एक करोड पेक्षा अधिक प्वाशांनी केल्याचे मध्य रेल्वेने म्हटलेले आहे. सध्या मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ते कल्याण, बदलापूर, टिटवाळा या उपनगरीय विभागात 56 एसी लोकल ट्रेन सुरू आहेत.

या महिन्यातील प्रवाशांची वाढ खालील प्रमाणे

एप्रिल 2022 या काळामध्ये पाच लाख 92 हजार 836 प्रवासी

मे 2022 मध्ये आठ लाख छत्तीस हजार सातशे प्रवासी

जून 2022 मध्ये 11,3969 प्रवासी

जुलै 2022 मध्ये 10 लाख 79 हजार 50 प्रवासी

ऑगस्ट महिन्यात 12 लाख 37 हजार 579 प्रवासी

सप्टेंबर महिन्यात 13 लाख 82 हजार 806 प्रवासी

ऑक्टोबर महिन्यात 12 लाख 74,409 प्रवासी

नोव्हेंबर महिन्यात बारा लाख 53 हजार 896 प्रवासी आणि सरते शेवटी वर्ष अखेर डिसेंबर 2022 मध्ये 12 लाख 39 हजार 419 व्यक्तींनी एसी ट्रेनने प्रवास केल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details