महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 13, 2023, 7:43 PM IST

Updated : Apr 13, 2023, 7:56 PM IST

ETV Bharat / state

Exchanging Boarding Passes : तिकीटांची अदलाबदली करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांच्या मुसक्या मुंबई विमानतळ पोलिसांनी आवळल्या

मुंबईत चक्क विमान तिकिटांची अदलाबदली केल्याने दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एक श्रीलंकेचा आणि दुसरा जर्मनीचा नागरिक आहे. त्यांनी काठमांडू आणि लंडनला जाण्याची एकमेकांची तिकीटे आपसात बदलली होती.

Mumbai Police arrest 2 foreigners
Mumbai Police arrest 2 foreigners

मुंबई - मुंबई पोलिसांना एका श्रीलंकेच्या मूळ आणि एका जर्मन नागरिकाला ते लंडन आणि काठमांडूला जाण्यासाठी विमानतळावर बोर्डिंग पासची अदला बदली केल्याचे लक्षात आले त्यानंतर या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आज ही माहिती दिली.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर चक्क तिकीट अदलाबदलीची घटना समोर आली आहे. एका 22 वर्षीय श्रीलंकन नागरिक, जो बनावट पासपोर्टवर प्रवास करत होता आणि 36 वर्षीय जर्मन नागरिका ज्यांना लंडन आणि काठमांडूला जायचे होते. त्यांनी येथील विमानतळावरील टॉयलेटमध्ये बोर्डिंग पासची अदलाबदली केली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.

श्रीलंकन नागरिकाच्या पासपोर्टवरील डिपार्चर स्टॅम्प बनावट असल्याचे एका विमान कंपनीच्या तपासणीसाच्या लक्षात आले. त्यानंतर ही गंभीर बाब उघडकीस आली, असे ते पोलीस अधिकारी म्हणाले. पासपोर्टवरील डिपार्चर स्टॅम्प क्रमांक त्याच्या बोर्डिंग पासवरील स्टॅम्प क्रमांकापेक्षा वेगळा असल्याचेही आढळून आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

जर्मन नागरिक पकडला गेल्याचे लक्षात आल्यानंतर, श्रीलंकन नागरिक, जो यूकेला पोहोचला होता, त्याने त्याची मूळ ओळख उघड केली. त्यानंतर त्याला मंगळवारी मुंबईला पाठवण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, त्याने पोलिसांना सांगितले की त्याला करिअरच्या चांगल्या संधीसाठी यूकेला जायचे होते, त्यामुळे त्याने काठमांडूऐवजी लंडनचे विमान पकडले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

काठमांडूला जाणारा बोर्डिंग पास असलेल्या जर्मन नागरिकालाही पोलिसांनी पकडल्याने आता त्यांची चौकशी सुरू असल्याचे आज पोलिसांनी स्पष्ट केले. दोन परदेशी लोकांच्या चौकशीदरम्यान, हे दोघेही 9 एप्रिल रोजी मुंबईतील विमानतळाजवळील एका आलिशान हॉटेलमध्ये थांबले होते आणि त्यांनी बोर्डिंग पास बदलण्याची योजना आखली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. सहार पोलिसांनी दोन जणांवर यासंदर्भात फसवणूक आणि गुन्हेगारी कट या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात आणखी काही लोकांचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - Friend Murder Case In Beed: मोबाईल चोरीची तक्रार देणे पडले महागात; मित्रानेच केला मित्राचा खून

Last Updated : Apr 13, 2023, 7:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details