महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 10, 2019, 9:24 PM IST

Updated : Sep 10, 2019, 9:47 PM IST

ETV Bharat / state

काँग्रेसला दिवसभरात तिसरा धक्का.... कृपाशंकर सिंहांनीही सोडली 'हाताची' साथ

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे जेष्ठ नेते कृपाशंकर सिंग यांनी काँग्रेसचा 'हाथ' सोडत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मंगळवारी त्यांनी दिल्ली येथे पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना आपला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर उद्या (बुधवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग

मुंबई - राज्यात आयाराम-गयारामांचे वारे दिवसेंदिवस वेगात वाहत आहेत. यामध्ये आज (मंगळवारी) दिवसभरात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला तिसरा धक्का बसला. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे जेष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसचा 'हाथ' सोडत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मंगळवारी त्यांनी दिल्ली येथे पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना आपला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर उद्या (बुधवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

हेही वाचा -आघाडीतही 'इनकमिंग'...भाजपचे माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

दरम्यान काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी राजीनामा देण्याची दिवसभरातील ही तिसरी घटना होती. जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच पक्षात प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला.

हेही वाचा -पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला 'गुडबाय'

तर विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या एक महिन्यावर आली आहे. तरीदेखील आघाडीच्या नेत्यांचे राजीनामा सत्र सुरु असल्याने दिवसेंदिवस पक्षांची वाट बिकट होताना दिसत आहे.

Last Updated : Sep 10, 2019, 9:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details