महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 9, 2020, 4:26 AM IST

ETV Bharat / state

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आता होणार कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग

कौशल्य विकास विभागाचे मंत्री नवाब मलिक आणि उद्योग विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांच्यामध्ये ऑनलाइन 'महाजॉब पोर्टल'च्या निमित्ताने वाद झाला होता. तो वाद क्षमवण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे नाव आता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, असे करण्यात आले आहे.

मंत्रालय
मंत्रालय

मुंबई - कौशल्य विकास विभागाचे मंत्री नवाब मलिक आणि उद्योग विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांच्यामध्ये ऑनलाइन 'महाजॉब पोर्टल'च्या निमित्ताने वाद झाला होता. तो वाद क्षमवण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे नाव आता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, असे करण्यास बुधवारी (दि. 8 जुलै) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

रोजगार व स्वयंरोजगार या विभागाचे नाव यापूर्वीच कौशल्य विकास व उद्योजकता, असे करण्यात आले आहे. मात्र, या नावात रोजगार हा शब्द नसल्याने रोजगार व स्वयंरोजगार बाबींसंदर्भात जनतेत संभ्रम निर्माण होतो. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

रोजगारासाठी असलेल्या कौशल्य विकास विभागाच्यावतीने ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया यापूर्वी होती. त्यानंतर उद्योग विभागाने यासंदर्भात महाजॉब पोर्टल सुरू केल्याने काही काळ वादंग निर्माण झाला होता. त्यावर तोडगा काढत नवाब मलिक यांच्या विभागाचे नामविस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

हेही वाचा -'अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत आम्हाला राजकारण नकोय, तर विद्यार्थ्यांचे हित पाहायचंय'

ABOUT THE AUTHOR

...view details