महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्याच्या ४८ लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान मोदींची 'मन की बात'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारच्या माध्यमातून देशभर सुरू असलेल्या विकास यात्रेत जन सामान्यांना जोडण्याच्या हेतू आहे. त्यासाठीच 'मन की बात, मोदी के साथ' या देशव्यापी अभियानाचा शुभारंभ रविवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्ली येथे केला होता.

By

Published : Feb 6, 2019, 12:00 PM IST

MODI

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या युतीचा तिढा कायम असला तरी दोन्ही पक्षांनी प्रचाराची तयारी केली आहे. याच अनुषंगाने राज्यातल्या ४८ मतदार संघात भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या आधारे रथयात्रा काढली आहे.

भारत के मन की बात, मोदी के साथ या रथ यात्रेला भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपचा झेंडा दाखवून सुरुवात केली. भारत के मन की बात, मोदी के साथ या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होता. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीला गेल्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हस्ते या यात्रेला झेंडा दाखवण्यात आला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारच्या माध्यमातून देशभर सुरू असलेल्या विकास यात्रेत जन सामान्यांना जोडण्याच्या हेतूने भारत के मन की बात, मोदी के साथ या देशव्यापी अभियानाचा शुभारंभ रविवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्ली येथे केला होता. भाजप प्रदेश कार्यालय येथून ४८ लोकसभा क्षेत्रात पोहोचणाऱ्या डिजीटल विकास रथाला रवाना करण्यात आले. या यात्रेच्या माध्यमाने भाजपच्या संकल्प पत्रासाठी जनतेकडून सूचना घेण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. भारत के मन की बात, मोदी के साथ या अभियानाच्या माध्यमातून राज्याच्या ४८ लोकसभा मतदार संघात पोहोचणाऱ्या या ४२ डिजिटल विकास रथाद्वारे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details