महाराष्ट्र

maharashtra

मालाड दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 'त्या' तरूणीला 14 तासानंतर बाहेर काढण्यात यश

By

Published : Jul 2, 2019, 4:50 PM IST

Updated : Jul 2, 2019, 8:29 PM IST

मालाड दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 'त्या' तरूणीला 14 तासांनी बाहेर काढले

2019-07-02 16:30:06

मालाडमधील पिंपरी पाड्यातील भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 25 वर्षीय तरूणीला अखेर 14 तासानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे.

मालाड दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 'त्या' तरूणीला 14 तासानंतर बाहेर काढण्यात यश

मुंबई- मालाडमधील पिंपरी पाड्यातील भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 25 वर्षीय तरूणीला अखेर 14 तासानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या तरूणीची जगण्यासाठी झुंज सुरू आहे. संचिता नलावडे, असे ढिगाऱ्याखालून काढलेल्या तरूणीचे नाव आहे.

मुंबईत गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मालाडमध्ये पिंपरीपाडा परिसरात घरांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये संचिताचे संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडले आहे. ननावरे कुटुंबियात संचिताच्या 2 बहिणी, 1 भाऊ व आई-वडील असा परिवार होता. 

मुळचे सोलापूरच्या बार्शी गावातील हे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मुंबईतील मालाड मध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांपासून वास्तव्यास होते.
 

Last Updated : Jul 2, 2019, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details