महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 23, 2020, 1:10 AM IST

ETV Bharat / state

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वकिलाचा मृत्यू झाल्याचा सहकाऱ्यांचा आरोप; गुन्हा नोंद करण्याची मागणी

अंधेरी न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असणारे के.के. शुक्ला यांना मंगळवारी अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांना आक्सन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, अचानक त्यांचा आज उपचारा दरम्यान रुग्णालयातच मृत्यू झाला. डॉक्टरांचा निष्काळजीपणाच त्यांच्या मृत्युस कारणीभूत असल्याचा आरोप शुक्ला यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

Lawyer's death due to doctor negligence elligation Made by fellow advocates
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वकिलाचा मृत्यू झाल्याचा सहकाऱ्यांचा आरोप; गुन्हा नोंद करण्याची मागणी

मुंबई - साकीनाका परिसरातील आक्सन रुग्णालयात अंधेरी न्यायालयातील वकील के. के. शुक्ला यांचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा आरोप सहकारी वकिलांनी केला आहे. याप्रकरणी आक्सन रुग्णालयाच्या विरोधात गुन्हा नोंद करावा, अशी मागणीही सहकारी वकिलांनी केली आहे.


अंधेरी न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असणारे के.के. शुक्ला यांना मंगळवारी अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांना आक्सन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, अचानक त्यांचा आज उपचारा दरम्यान रुग्णालयातच मृत्यू झाला. डॉक्टरांचा निष्काळजीपणाच त्यांच्या मृत्युस कारणीभूत असल्याचा आरोप शुक्ला यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. त्याचबरोबर रुग्णालयावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली आहे. यावेळी सर्व जण रुग्णालयात जमा झाले होते. मात्र, सकिनाका पोलिसांनी त्यांचा मृतदेह पीएम सेंटरला पाठवून रिपोर्ट आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तरी वकील त्यांच्या भूमिकेवर अडून बसले होते. त्यामुळे रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. मृत वकिलाचे पार्थिव शरीर पोलिसांनी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय अहवालासाठी पाठवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details