महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 7, 2019, 4:03 PM IST

ETV Bharat / state

दारिद्र्याशी लढा देत चेंबुरच्या राहुलची ‘इस्रो’पर्यंत झेप; पहा थक्क करणारा प्रवास

जन्मापासून गरिबीचे चटके सोसत असताना चांगले शिक्षण घेऊन उच्च पदावर जाण्याची गाठ मनाशी बांधून, केवळ मेहनतीच्या जोरावर चेंबूर येथील राहुल घोडके या मुलाने अहमदाबादमधील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेपर्यंत (इस्रो) झेप घेतली आहे. चेंबूर येथील मारवली चर्च परिसरातील नालंदानगर झोपडपट्टीत राहुलचे दहा बाय दहाचे घर आहे. दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर त्याच्यावरील वडिलांचे छत्र हरपले. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या आईवर आली. आईने परिसरातील घरची धुणी-भांडी आणि स्वयंपाकाचे काम करून उदरनिर्वाह केला.

दारिद्र्याशी लढा देत चेंबुरच्या राहुलची ‘इस्रो’ पर्यंत झेप

मुंबई - जन्मापासून गरिबीचे चटके सोसत असताना चांगले शिक्षण घेऊन उच्च पदावर जाण्याची गाठ मनाशी बांधून, केवळ मेहनतीच्या जोरावर चेंबूर येथील एका मुलाने अहमदाबादमधील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेपर्यंत (इस्रो) झेप घेतली आहे. राहुल घोडके असे या मुलाचे नाव आहे. सध्या इस्रोत तो तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे.

दारिद्र्याशी लढा देत चेंबुरच्या राहुलची ‘इस्रो’ पर्यंत झेप

चेंबूर येथील मारवली चर्च परिसरातील नालंदा नगर झोपडपट्टीत राहुलचे दहा बाय दहाचे घर आहे. जवाहर विद्यालयात त्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर त्याच्यावरील वडिलांचे छत्र हरपले. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या आईवर आली. आईने परिसरातील घरची धुणी-भांडी आणि स्वयंपाकाचे काम करून उदरनिर्वाह केला. आईची होणारी फरपट पाहून राहुलने आपले शिक्षण थांबवून मोठी बहिण दर्शनाच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. स्वतः ही कामाला जाऊ लागला.

हेही वाचा -आदिवासी पाड्यावार 'एक करंजी लाखमोलाची' या उपक्रमाचे आयोजन; वंचितांना कपडे व फराळाचे वाटप

मात्र, शिक्षणाची ओढ त्याला शांत बसू देत नव्हती. दोन वर्षांनंतर त्याने आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. खूप मेहनत घेऊन त्याने अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर व्हजेटीआय महाविद्यालयात शिकत असतानाच त्याला नोकरी मिळाली. दरम्यान, इस्रोत भरती होण्याची इच्छा मनाशी ठेवून तो परीक्षेच्या तयारीला लागला. भारतातील 15000 पेक्षा जास्त मुलांनी ही परिक्षा दिली. परीक्षेत राहुल हा मागासवर्गीय गटातून 3ऱ्या श्रेणीने तर खुल्या गटातून 16व्या श्रेणीने उत्तीर्ण झाला. त्यानंतर राहुलची इस्रोच्या अहमदाबादमधील केंद्रात तंत्रज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details