मुंबईED Raid:'मनी लॉन्ड्रिंग' प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) नोंदवलेल्या 'पॅराबॉलिक ड्रग्ज' प्रकरणात दिल्ली, मुंबई, चंदीगड, पंचकुला आणि अंबाला येथील 17 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या प्रकरणी 'ईडी'ने देशात मोठ्या प्रमाणावर छापेमारी कारवाई सुरू केली आहे. विनीत गुप्ता आणि प्रणव गुप्ता हे अशोका विद्यापीठाचे संस्थापक असल्याचे तपासात उघड झालं आहे. 'ईडी'च्या छापेमारी प्रकरणी खुलासा देताना अशोका विद्यापीठाने 'पॅराबॉलिक ड्रग्ज' प्रकरणाचा विद्यापीठाशी संबंध नसल्याचे सांगितलं आणि या प्रकरणाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न हा दिशाभूल करणारा असल्याचं 'स्टेटमेंट' दिलं आहे. 'ईडी'ने अशोका विद्यापीठाचे संस्थापक विनीत गुप्ता आणि प्रणव गुप्ता संचालक असलेल्या 'पॅराबॉलिक ड्रग्ज'च्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात माहिती मागवली असल्याचे 'अशोका युनिव्हर्सिटी'ने एका निवेदनात नमूद केले आहे. (ED raids at Ashoka University founder)
17 ठिकाणांवर छापेमारी:'मनी लॉन्ड्रिंग' प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) नोंदवलेल्या 'पॅराबॉलिक ड्रग्ज' प्रकरणात दिल्ली, मुंबई, चंदीगड, पंचकुला आणि अंबाला येथील 17 ठिकाणी आज ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. या प्रकरणात 'पॅराबॉलिक ड्रग्ज लिमिटेड' आणि या कंपनीचे संचालक, प्रणव गुप्ता आणि विनीत गुप्ता यांनी 1,600 कोटी रुपयांची बँक फसवणूक केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. अशोका विद्यापीठ पुनरुच्चार करते की, 'पॅराबॉलिक ड्रग्ज'चा अशोक विद्यापीठाशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही. 'अशोका युनिव्हर्सिटी'चा 'पॅराबॉलिक ड्रग्ज'शी कोणताही संबंध नाही. कंपनीची चौकशी केली जात आहे आणि या प्रकरणास 'युनिव्हर्सिटी'शी जोडण्याचा कोणताही प्रयत्न कोणत्याही आधाराशिवाय केल्यास तो दिशाभूल करणारा आहे, असे 'युनिव्हर्सिटी'च्या निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी 'ईडी' तपास करत आहे.