महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 31, 2022, 7:02 PM IST

ETV Bharat / state

Ashish Shelar Letter to Legislative Secretary : विधानभवनात प्रवेश द्या; आमदारांचे निलंबन रद्द झाल्यानंतर आशिष शेलारांचे सचिवांना पत्र

भारतीय जनता पक्षाच्या निलंबित 12 आमदारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ( Supreme Court MLA Suspension Cancellation Decision ) मुंबई आणि नागपूरच्या विधानभवनात ( Entry in Mumbai and Nagpur Vidhan Bhavan ) प्रवेश मिळावा, यासाठी भाजप नेते आमदार आशिष शेलार ( BJP Leader and MLA Ashish Shelar ) यांनी पत्र लिहिले आहे.

Ashish Shelar
आशिष शेलार

मुंबई -भारतीय जनता पक्षाच्या निलंबित 12 आमदारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ( Supreme Court MLA Suspension Cancellation Decision ) मुंबई आणि नागपूरच्या विधानभवनात ( Entry in Mumbai and Nagpur Vidhan Bhavan ) प्रवेश मिळावा, यासाठी भाजप नेते आमदार आशिष शेलार ( BJP Leader and MLA Ashish Shelar ) यांनी पत्र लिहिले आहे. विधान भवन सचिवांना शेलार यांनी हे पत्र लिहिले. ( Ashish Shelar Letter to Legislative Secretary )

भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. एक वर्ष एवढा प्रदीर्घ काळासाठी आमदारांना निलंबित करता येणार नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांना मुंबई आणि नागपूरच्या विधान भवनात प्रवेश मिळावा. यासाठी निलंबित बारा आमदार यांच्या वतीने आशिष शेलार यांनी विधान भवन सचिवांना पत्र लिहले आहे.

पत्रात काय?

28 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने हे निलंबन रद्द केले. न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सविस्तर कायदेशीर माहिती सचिवांना अवगत केली असून सोबत निवाड्यांची प्रत देखील देण्यात आले आहे. न्यायालयाने निलंबन रद्द केल्यामुळे यापुढे विधिमंडळाच्या मुंबई आणि नागपूर येथील विधानभवन परिसरात प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असल्याचं आपल्या पत्रात आशिष शेलार म्हणाले आहेत. निलंबन रद्द झाल्यामुळे सचिवांनी विधान भवन परिसरामध्ये 12 आमदारांना परवानगी द्यावी, असा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आला आहे.

आशिष शेलारांनी लिहिलेले पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details