लग्नाचे आमिष देखील दाखवून केले अत्याचार - पीडिता मुंबई:पीडित तरुणी ही मंगेश सातमकर यांची कार्यकर्ता असून ती गेल्या काही वर्षांपासून त्यांचे 'सोशल मीडिया' आणि 'पीआर'चे काम पाहत होती. तिने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, मंगेश सातारकर याने तिचे लैंगिक शोषण केले आहे. शाखेच्या मागे एक केबिन बनवून त्या ठिकाणी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला असल्याची माहिती पीडित तरुणीने दिली आहे. मंगेश सातमकरने राहत्या घरी पीडितेला बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे आरोप पीडित तरुणीने केले आहेत. त्याचप्रमाणे लग्नाचे आमिष देखील दाखवले असल्याचे तिने सांगितले आहे.
पीडितेचा घराचत गर्भपात: गेल्या वर्षी 3 डिसेंबरला लोणावळा येथील एका मित्राच्या बंगल्यावर मंगेश सातमकर हे पीडित तरुणीला काहीतरी सांगायचे असल्याचे कारण सांगून घेऊन गेले होते. त्यावेळी देखील आरोपी सातारकर यांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पीडित तरुणीने मंगेश सातमकर यांना कल्पना दिली असता त्यांनी एका डॉक्टराच्या सल्ल्याने तिचा घरातच गर्भपात केल्याचे पीडितेने सांगितले.
पीडितेला लग्नाचे आमिष: त्यानंतर पीडित तरुणीने आपल्याला न्याय मिळावा म्हणून विभागातील मातृ सोशल फाउंडेशनकडे मदतीचा हात मागितला. त्यानंतर फाउंडेशनच्या मदतीने पीडित तरुणने वडाळा टी टी पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या विरोधात बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणी लेखी तक्रार दाखल दिली होती; मात्र, गुन्हा अँटॉप हिल पोलीस ठाण्याच्या परिसरात घडल्याने अँटॉप हिल पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीला लग्नाच्या भूलथापा देऊन लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मंगेश सातमकर यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया मातृ सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष संजना हळदणकर यांनी व्यक्त केली आहे.
रात्री व्हिडीयो कॉल: आरोपी मंगेश सातमकर हे पीडितेला रात्री व्हिडीओ कॉल नको ते कृत्य करायला लावायचे. पीडितेला हे सगळ आवडत नव्हत, म्हणून तिने त्यांना नकार दिला तर ते तिला तुझं बाहेर काहीतरी आहे, असे बोलून इमोशनल ब्लॅकमेल करून दबाव टाकत होते. म्हणून ते सांगतील ते सगळे पीडित तरुणी करत गेली.
हेही वाचा:Sharad Pawar Political Heir: शरद पवारांनी वारसदार ठरवले; दिल्ली सुप्रिया सुळे, राज्य अजित पवारांकडे?