महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Political Crisis : ' ... म्हणून आम्ही एकत्र आलो, कोण क्लिन बोल्ड झाले हे सर्वांनी पाहिले'

By

Published : Jul 2, 2023, 3:30 PM IST

Updated : Jul 2, 2023, 6:56 PM IST

अजित पवार यांनी (Maharashtra Political Crisis) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या सर्व घ़डामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (NCP Political Crisis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र आल्याचे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde on NCP Crisis) यावेळी म्हणाले.

Etv Bharat
Etv Bharat

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई - अजित पवार हे राज्याचे नवीन (Maharashtra Political Crisis) उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली (NCP Political Crisis) आहे. मंत्रिमंडळात जागावाटपावर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आम्ही एकत्र आलो (Eknath Shinde on NCP Crisis) आहोत.

हे नवीन सरकार नाही, शिवसेना आणि भाजप सरकार पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. विकासाची कामे सुरू होती आणि विकास कामावर विश्वास ठेवणाऱ्या अजित पवारांनी सरकारला साथ दिली. मी त्यांचे आणि त्यांच्या आमदारांचे मनापासून स्वागत करतो. त्यांच्याकडे अनेक खासदार आणि आमदार आहेत जे महाराष्ट्राच्या विकासाला नक्कीच मदत करतील. डबल इंजिन असलेले हे सरकार आता बुलेट ट्रेनच्या वेगाने धावणार आहे. काही लोक गुगली आणि क्लीन बोल्डबद्दल बोलत होते, पण आज सगळ्यांनी पाहिलं की कोण क्लीन बोल्ड झाले - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

ट्रिपल इंजिन सरकार -आता आमच्याकडे 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत. डबल इंजिनचे सरकार आता ट्रिपल इंजिन बनले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी मी अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांचे स्वागत करतो. अजित पवारांच्या अनुभवामुळे महाराष्ट्र मजबूत होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

अजित पवारांचे बंड -अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता पत्रकार परिषद घेत यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

नऊ आमदारांनी घेतली शपथ -अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाशी शपथ घेतली आहे. त्यांना कोणती मंत्रिपदे मिळणार? याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासह जलसंपदा हे खाते असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ वरिष्ठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

हेही वाचा -

  1. NCP Political Crisis : बंडखोर आमदारांनी माझ्याशी संपर्क साधला, लवकरच....; शरद पवारांची प्रतिक्रिया
  2. Maharashtra Political Crisis : विरोधी पक्षांची आघाडी कमकुवत करण्याचा प्रयत्न?
  3. Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड
Last Updated : Jul 2, 2023, 6:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details