मुंबई - कोरोनाच्या संकटात अडचणीत सापडलेल्या गरीबांना परदेशातील भारतीय नागरिक अन्नधान्याची मदत करत आहेत. अमेरिकेतील 11 वर्षाच्या रोहन सांखोलकर याने आपला वाढदिवस साजरा न करता बोरिवली दहिसर येथील गरजूंना 7000 किलोचे अन्नधान्य वाटप केले आहे. या मदतीतून त्याने आपली सामाजिक कृतज्ञता पार पाडली आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून दहिसर, संतोषी माता रोड येथील रहिवाशांना थेट आजोबा राजन नाडकर्णी यांच्यामार्फत मदत केली आहे. एकीकडे मुख्यमंत्री निधीसाठी लहान मुलं आपला वाढदिवसाच्या निधीतन तुटपुंजी मदत करताना पाहायला मिळत आहेत. आता शिवसेनेच्या माध्यमातून थेट अन्नधान्याची मदत करण्यासाठी लहान मुलांचं योगदान दिसत आहे.