महाराष्ट्र

maharashtra

मुलुंड विधानसभेत यावेळी काँग्रेस, मनसे देणार भाजपला धक्का ?

By

Published : Oct 14, 2019, 10:30 AM IST

Updated : Oct 14, 2019, 10:42 AM IST

ईशान्य मुंबईतील मुलुंड विधानसभा हा भाजपचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. मात्र, यावेळी सरदार तारासिंह यांच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे. मुलुंड मतदारसंघात अनेक काम प्रलंबित आहेत. त्यामुळे 'आता बस झालं कमळ' ही टॅग लाईन सध्या मुलुंडमध्ये व्हायरल होत आहे. यामुळे भाजपला मुलुंडमध्ये तरी पेपर सोप्पा जाणार नाही, हे मात्र नक्की झाले आहे.

मुलुंड विधानसभेत यावेळी काँग्रेस, मनसे देणार भाजपला धक्का ?

मुंबई - गेल्या अनेक काळापासून मुलुंड मतदार संघात आमदार असलेले सरदार तारासिंग यांना डावलून कोट्यधीश असलेले मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून मुलुंड हा विभाग भाजपचा सर्वात सुरक्षित विभाग आहे. मात्र, यावेळी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला धक्का देण्याची रणनीती आखली आहे.

मुलुंड विधानसभेत यावेळी काँग्रेस, मनसे देणार भाजपला धक्का ?

हेही वाचा -निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; 32 लाखांचे होते बक्षीस

ईशान्य मुंबईतील मुलुंड विधानसभा हा भाजपचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. मात्र, यावेळी सरदार तारासिंह यांच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे. मुलुंड मतदारसंघात अनेक काम प्रलंबित आहेत. त्यामुळे 'आता बस झालं कमळ' ही टॅग लाईन सध्या मुलुंडमध्ये वायरल होत आहे. यामुळे भाजपला मुलुंडमध्ये तरी पेपर सोप्पा जाणार नाही, हे मात्र नक्की झाले आहे.

हेही वाचा -राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराचे शक्तिप्रदर्शन करत नामांकन दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात असल्यामुळे यंदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद रंगू शकतो. याची सुरूवात ही भाजपने केली होती. कोणत्याही चर्चेत नसलेले मिहीर कोटेचा यांना भाजपने या मतदारसंघात उमेदवारीत सर्वात पुढे असलेले नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांना मराठी असल्याचे कारणाने डावलले, अशी चर्चा या भागात आहे. तर मुंबई विधानसभा भागात कोणताही भाषेचा वाद नाही. मी भारतीय असून भाषेचे राजकारण करत नाही. मी विकासाचे राजकारण करत आहे असे भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनी सांगितले.

हेही वाचा -आरमोरीत काँग्रेसच्या उमेदवारावर अपहरणाचा गुन्हा दाखल ; राजकिय क्षेत्रात खळबळ

दुसरीकडे भाजपने 20 वर्षात कोणताही विकास केला नाही. फक्त इमारतींना पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम केले आहे. अग्रवाल रुग्णालयासाठी आम्ही लढतो आहे. आम्ही सत्तेत नसताना अनेक काम केली आहेत. मात्र, जर सत्तेत आलो तर कामांची लाईन लावू, असे मनसेच्या उमेदवार हर्षला चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा -वास्तव लपवून मोदींनी देश बरबाद केला - राहुल गांधी

पीएमसी बँकेच्या संचालकपदी भाजप समर्थक आहेत. त्यामुळे पीएमसी बँकेत झालेला गैरव्यवहार देखील भाजपला या विधानसभेत भोवण्याची चिन्हे आहेत. त्यात तारासिंह यांच्या पुत्राचे नाव देखील आहे. तसेच मागील निवडणूकीत काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले काँग्रेस मुंबई उपाध्यक्ष चरण सिंग सप्रा देखील याप्रकरणी आक्रमक झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी हे प्रकरण लावून धरले आहे, याचा फायदा ही काँग्रेसला होऊ शकतो. गेल्या काही वर्षात या मतदारसंघात विकास थांबलेला आहे. इमारतींचा पुनर्विकास,वाहतूककोंडी असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आणि हा विकास आम्हीच करू शकतो. पीएमसी बँकेतून 1000 रुपयांची मर्यादा ही 2500 हजार रुपये काँग्रेसमुळेच करण्यात आली आहे. असे काँग्रेसचे उमेदवार गोविंद सिंग यांनी म्हटले आहे.

या सर्व प्रकारामुळे भाजपला मुलुंडमध्ये तरी पेपर सोप्पा जाणार नाही, हे मात्र नक्की झाले आहे.

Last Updated : Oct 14, 2019, 10:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details