महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 5, 2022, 4:59 PM IST

ETV Bharat / state

ACB Raid On BMC Engineer : ५० लाखांची लाच घेताना पालिका अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

मुंबई महापालिकेत कार्यकारी अभियंता या पदावरील सतीश पोवार (वय ५७ वर्षे) या वरिष्ठ अधिकाऱ्याला ५० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( ACB Raid On BMC Engineer ) रंगेहात पकडले (BMC engineer caught red handed) आहे. त्याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद (case registered under Prevention of Corruption Act) करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत विभागाकडून देण्यात आली आहे. Mumbai Crime, Latest news from Mumbai

ACB
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

मुंबई :मुंबई महापालिकेत कार्यकारी अभियंता या पदावरील सतीश पोवार (वय ५७ वर्षे) या वरिष्ठ अधिकाऱ्याला ५० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( ACB Raid On BMC Engineer ) रंगेहात पकडले (BMC engineer caught red handed) आहे. त्याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद (case registered under Prevention of Corruption Act) करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत विभागाकडून देण्यात आली आहे. Mumbai Crime, Latest news from Mumbai

५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी -मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व येथे एका कंपनीचे शेड होते. हे शेड अनधिकृत असल्याची १३ ऑक्टोबरला पालिकेच्या के पूर्व विभागाकडून नोटीस देण्यात आली होती. १९ ऑक्टोबरला याबाबत पालिकेला उत्तर देण्यात आले होते. त्यानंतर २८ ऑक्टोबरला पालिकेचे पथक शेड तोडण्यासाठी गेले असता सबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश पोवार यांना कंपनीच्या संबंधितांनी संपर्क साधला. यावेळी पोवार यांनी ५० लाख रुपयांची मागणी केली.


रंगेहात पकडले -पालिकेचा कार्यकारी अभियंता ५० लाख रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार कंपनीच्या संबंधितांनी लाच लुचपत विभाग, मुंबई यांच्याकडे केली होती. ४ नोव्हेंबर रोजी ५० लाख रुपयांची लाच घेताना सतीश पोवार याला रंगेहात पकडण्यात आले आहे. पोवार विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details