महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता... सकाळी 9 पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडीवर एक नजर...

बळीराजाला आतुरता असलेला पाऊस 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. फोटो दाखवून लग्नासाठी ब्लॅकमेलिंग केल्यामुळे गोदावरी नदीत उडी घेऊन तरुणीनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चोवीस तास उलटल्यानंतरही भारतीय हवाईदलाचे आयएएफ एएन-३२ विमान अजून बेपत्ताच असून त्याचा शोध सुरू आहे. भिवंडीत रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने नराधमाने चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तर तिकडे Cricket World Cup मध्ये पाकिस्तानचा इंग्लंडला 'दे धक्का म्हणत १४ धावांनी शानदार विजय मिळवला आहे.

By

Published : Jun 4, 2019, 9:29 AM IST

आज...आत्ता

महाराष्ट्रात १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज

मुंबई - केरळमध्ये ६ जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज आहे. जर ६ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये आला तर महाराष्ट्रात मान्सून १० तारखेपर्यंत दाखल होऊ शकतो, अशी माहिती हवामान विभागाच्या तज्ज्ञ शुभांगी भुत्ते यांनी दिली. वाचा सविस्तर

फोटो दाखवून लग्नासाठी 'ब्लॅकमेलिंग', गोदावरी नदीत उडी घेऊन तरुणीची आत्महत्या

नाशिक - गंगापूरच्या एका २० वर्षीय तरुणीने शिवाजी केदारे या व्यक्तीकडून लग्नासाठी होत असलेल्या 'ब्लॅकमेलिंग'ला कंटाळून गोदावरी नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोशनी हिरे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मृत तरुणीच्या आईने गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. वाचा सविस्तर

भारतीय हवाईदलाचे आयएएफ एएन-३२ विमान अजून बेपत्ता; चोवीस तास उलटल्यानंतरही शोधकार्य सुरूच

नवी दिल्ली - आसाममधील जोरहात विमानतळावरून उड्डाण केलेले आएएफ एएन-३२ हे लष्करी विमान बेपत्ता झाले आहे. विमान अरुणाचल प्रदेशातील मेनचुका विमानतळाकडे निघाले होते. विमानात हवाई दलाचे १३ कर्मचारी आहेत. ३ जून रोजी १२ वाजून २५ मिनिटांनी उड्डाण केल्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून या विमानाचा संपर्क तुटला. मेनचुका हवाईक्षेत्रात हे विमान बेपत्ता झाले आहे. हे विमान बेपत्ता होऊन २४ तास उलटले आहेत. तरीही, अद्याप या विमानाचा शोध लागलेला नाही. शोधकार्य अद्यापही सुरूच आहे. वाचा सविस्तर

भिवंडीत रस्ता दाखविण्याच्या बहाण्याने आठ वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून बलात्कार

ठाणे - राहत्या घरासमोर खेळत असलेल्या आठ वर्षांच्या चिमुरडीला रस्ता दाखविण्याचा बहाणा करत निर्जनस्थळी नेऊन एका अज्ञाताने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर नराधम फरार झाला असून भिवंडी पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. वाचा सविस्तर

Cricket World Cup : पाकिस्तानचा इंग्लंडला 'दे धक्का'; १४ धावांनी शानदार विजय

नॉटिंगहॅम - विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात पाकने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 50 षटकांमध्ये 348 धावांचा डोंगर उभा केला. पाककडून बाबर आझम (६३), मोहम्मद हाफिझ (८४) आणि कर्णधार सर्फराझ अहमद (५५) यांनी शानदार अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या तिनशेपार नेली. तर, सलामीवीर इमाम-उल-हकने ४४ आणि फखर झमानने ३६ धावा करत चांगली सुरुवात करुन दिली होती. वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details