महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळग्रस्तांना दीड लाख अधिकाऱ्यांचे एक दिवसीय वेतन; ५० कोटींचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

राज्यातील दीड लाख राजपत्रित अधिकारी दुष्काळग्रस्तांसाठी आपले एक दिवसाचे वेतन देणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राजपत्रित अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थपक अध्यक्ष ग. दी. कुलथे यांनी सांगितले.

By

Published : Jun 8, 2019, 1:28 PM IST

दुष्काळग्रस्तांना दीड लाख अधिकाऱ्यांचे एक दिवसीय वेतन

मुंबई- सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून राज्यातील दीड लाख राजपत्रित अधिकारी दुष्काळग्रस्तांसाठी आपले एक दिवसाचे वेतन देणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राजपत्रित अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थपक अध्यक्ष ग. दी. कुलथे यांनी सांगितले.

दुष्काळग्रस्तांना दीड लाख अधिकाऱ्यांचे एक दिवसीय वेतन

जून महिन्याच्या वेतनातून मुख्यमंत्री निधीत एक दिवसाचे वेतन जमा करावेत, असे पत्रही मुख्यमंत्री कार्यलयाला दिले असल्याचे कुलथे यांनी सांगितले.

राज्यातील भीषण दुष्काळ पाहून कार्यकारिणीच्या बैठकीत यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली. या संकटाशी सामना करताना राजपत्रित अधिकारी ही जनता आणि सरकारच्या सोबत आहे. या जाणिवेतून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ हीच आपत्ती नाही तर अनेकदा भूकंप, पूर आणि नुकताच केरळमध्ये आलेल्या पुरग्रस्तांनाही राजपत्रित अधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिला असल्याचे कुलथे यांनी स्पष्ट केले.

राज्यातल्या अधिकाऱ्यांच्या एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीत जमा केल्यास दुष्काळग्रस्तांसाठी सुमारे ५० कोटींचा निधी उपलब्ध होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले

ABOUT THE AUTHOR

...view details