महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 20, 2019, 8:23 PM IST

ETV Bharat / state

प्रशासन सज्ज : 79 उमेदवारांचे भवितव्य ठरविणार 19 लाख 15 हजार मतदार

जिल्ह्यातील 6 मतदारसंघासात सोमवारी मतदान पार पडणार असून यासाठी 2013 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी 10 हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन सज्ज

लातूर - विधानसभा निवडणुकतील प्रचाराच्या तोफा थंडवल्यानंतर आता सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन जय्यत तयारीला लागले आहे. जिल्ह्यातील 6 मतदारसंघासाठी 2013 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. रविवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून मतदान केंद्रावर शासकीय वाहनातून सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत कर्मचाऱ्यांना ३ वेळेस मार्गदर्शन झाल्याची माहिती आहे. ही मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन निवडणुकांसाठी सज्ज

जिल्ह्यातील ६ मतदारसंघासाठी उद्या(सोमवार) मतदान पार पडणार आहे. लातूर शहर मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 3 लाख 72 हजार 369 मतदारांची संख्या आहे. तर, सर्वात कमी औसा मतदारसंघात 2 लाख 83 हजार एवढी मतदारसंख्या आहे. या निवडणुकीसाठी 10 हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून सर्व प्रशिक्षण ही पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - लातुरात विधानसभा प्रचाराची सांगता अन दारूचा महापूर

यंदा 79 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असून यांचे भवितव्य उद्या(सोमवार) ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. जिल्ह्यात 50 संवेदनशील मतदान केंद्र असून या ठिकाणी सीसीटीव्ही तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग बसविण्यात आली आहे. तसेच ही प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.

हेही वाचा - लातूरमध्ये शिवसेना उमेदवाराच्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांचा राडा

ABOUT THE AUTHOR

...view details