महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बस व दुचाकीचा अपघात : हकनकवाडी पाटीजवळ युवकाचा मृत्यु

आज दुपारी १२ वाजल्याच्या सुमारास उदगीर शहराजवळील हकनकवाडी पाटी येथे हा अपघात झाला. यात उदगीरहून अहमदपूरकडे जाणारी बस आणि तोंडारपाटीकडून उदगीरकडे येणाऱ्या मोटारसायकलचा समावेश आहे.

By

Published : Feb 18, 2019, 11:49 PM IST

अपघातग्रस्त बस

लातूर - बस-दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघातामध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उदगीर शहराजवळील हकनकवाडी पाटी येथे घडली. आज दुपारी १२ वाजल्याच्या सुमारास उदगीर शहराजवळील हकनकवाडी पाटी येथे हा अपघात झाला. यात उदगीरहून अहमदपूरकडे जाणारी बस आणि तोंडारपाटीकडून उदगीरकडे येणाऱ्या मोटारसायकलचा समावेश आहे.

अपघातामध्ये मृत्यू झालेल्या युवकाचे नाव राजा चंद्रकांत भांगे असे आहे. उदगीरहून अहमदपूरकडे जाणाऱ्या बसने (क्रमांक एमएच २० डी ९८०२) तोंडारपाटीकडून उदगीरकडे येणाऱ्या मोटारसायकलला (क्र. एम. एच. २४ झेड ९९६) समोरासमोर धडक दिली. त्यामुळे मोटारसायकल चालक राजा चंद्रकांत भांगे (रा. तोंडारपाटी) यांचा जागीच झाला आहे.

याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ मुलानी यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details