महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 6, 2021, 2:51 PM IST

ETV Bharat / state

स्वच्छतागृहाच्या भिंतींवर गड-किल्ल्यांचे चित्र; शिवभक्त आक्रमक

गड-किल्ले आमचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्याचा प्रत्येकाने आदर आणि सन्मान केला पाहिजे. स्वच्छतागृहाच्या भिंतींवर अशा पद्धतीने चित्र काढणे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. अशा ठिकाणी स्वच्छतेचे संदेश किंवा जनजागृती करणारे चित्र काढल्यास त्याला आमचा कधीही विरोध असणार नाही, असेही शिवभक्तांनी म्हटले आहे.

स्वच्छतागृहाच्या भिंतींवर गड-किल्ल्यांचे चित्र; शिवभक्त आक्रमक
स्वच्छतागृहाच्या भिंतींवर गड-किल्ल्यांचे चित्र; शिवभक्त आक्रमक

कोल्हापूर - शहरातल्या अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृहाच्या भिंतीवर पन्हाळगडासह राधानगरी धरणाचे चित्र काढण्याचा प्रकार घडला आहे. घडलेला हा प्रकार समजताच शिवभक्त चांगलेच आक्रमक झाले असून पांढऱ्या ऑइलपेंटद्वारे हे चित्र पुसण्यात आले आहे. यापूर्वीसुद्धा अशाच पद्धतीच्या काही घटना कोल्हापुरात घडल्या होत्या. त्यावेळीही शिवभक्तांनी आक्रमक होत चित्र पुसले होते. ज्यांनी कोणी हा प्रकार केला आहे, त्यांनी यापुढे काळजी घ्या अन्यथा, आमच्या पद्धतीने हिसका दाखवू, असा इशारा सुद्धा शिवभक्तांनी दिला आहे.

स्वच्छतागृहाच्या भिंतींवर गड-किल्ल्यांचे चित्र; शिवभक्त आक्रमक

हेही वाचा -महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे हिंगोलीत उत्पादन; नोकरी सोडून युवकाने केला यशस्वी प्रयोग



मंदिर परिसरात महिलांच्या स्वच्छतागृहांवर गडकिल्ल्याचे चित्र

अंबाबाई मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या सर्वांच्या स्वच्छतागृहांची विद्यापीठ हायस्कूलसमोर सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी स्वच्छतागृहाच्या भिंतीवर पन्हाळगडाच्या तीन दरवाज्यांचे तसेच, राधानगरी धरणाचे चित्र अर्धवट स्थितीत काढण्यात आले होते. स्वच्छतागृहांवर अशा पद्धतीने गड किल्ल्यांचे चित्र काढणे निषेधार्ह असून अशा घटना आम्ही कदापि सहन करणार नाही, म्हणत शिवभक्तांनी आज ही सर्व चित्रे ऑइल पेंटद्वारे पुसून टाकली. शिवाय, यापुढे असा प्रकार घडल्यास आमच्या पद्धतीने हिसका दाखवू, असा इशारा सुद्धा शिवभक्तांनी दिला आहे.


स्वच्छतेची किंवा जनजागृती करणारे चित्रे काढा त्याला आमचा विरोध नाही

गड-किल्ले आमचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्याचा प्रत्येकाने आदर आणि सन्मान केला पाहिजे. स्वच्छतागृहाच्या भिंतींवर अशा पद्धतीने चित्र काढणे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. अशा ठिकाणी स्वच्छतेचे संदेश किंवा जनजागृती करणारे चित्र काढल्यास त्याला आमचा कधीही विरोध असणार नाही. सध्या ही चित्रे आम्ही पुसून टाकली असून या ठिकाणी इतर जनजागृती करणारे संदेश किंव्हा घोषवाक्य लिहावी, असेही शिवभक्तांनी म्हटले आहे.


हेही वाचा -माघवारी निमित्ताने पंढरपुरात दोन दिवस संचार बंदी? वारकऱ्यांना न येण्याचे आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details