महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परवानगी नसतानाही कोल्हापूर जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन, पोलीस यंत्रणेचेही दुर्लक्ष

कोल्हापूरमध्ये चिखलगुठ्ठा बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुक येथे या स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. परवानगी नसतानाही या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. शिवाय कोरोनाची परिस्थिती असतानाही ही बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याचे समोर आले आहे.

By

Published : Sep 27, 2021, 12:07 PM IST

परवानगी नसतानाही कोल्हापूर जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन
परवानगी नसतानाही कोल्हापूर जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन

कोल्हापूर - बैलांच्या शर्यतीवर बंदी असतानाही कोल्हापूरमध्ये चिखलगुठ्ठा बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुक येथे या स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. परवानगी नसतानाही या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. शिवाय कोरोनाची परिस्थिती असतानाही ही बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दि केली होती.

परवानगी नसतानाही कोल्हापूर जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन
हजारो रुपयांच्या बक्षिसाची जाहिरात करून भरवल्या शर्यती

कोल्हापुमध्ये राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुक येथे या चिखलगुठ्ठा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांसाठी हजारो रुपयांच्या बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली होती. तशा जाहिरातीसुद्धा संबंधितांकडून करण्यात आल्या होत्या. दरम्यान, याबाबत पोलिसांना या गोष्टीची थोडीही कल्पना कशी नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये याबाबत अजूनही सर्वत्र काळजी घेतली जात आहे. असे असताना आशा स्पर्धा आयोजित करून गर्दी झाली याला जबाबदार कोण? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details