महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 4, 2022, 10:07 AM IST

ETV Bharat / state

Minister Chandrakant Patil : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा प्रश्न समन्वयाने सोडवला पाहिजे - मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil on controversy) यांनी राज्यपालांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया (Chandrakant Patil reaction on governor statements) दिली. महाराष्ट्र कर्नाटक वादाबाबत (Maharashtra Karnataka border dispute) त्यांनी राज्याची भूमिका स्पष्ट केली आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत होणाऱ्या आघाडीविषयी त्यांनी माहिती दिली आहे.

Higher and Technical Education Minister Chandrakant Patil
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सीमावाद शिगेला पोहोचला आहे. त्याबाबत बोलताना भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मी आणि शंभूराजे यांनी तासभर दिल्लीतील वकिलांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. ही केस ताकतीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. हा दोन राष्ट्रांच्या संघर्षाचा विषय नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्र दोघांनी समन्वयांना हा प्रश्न सोडवला पाहिजे. चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या वक्तव्यांवरून सुरु असलेल्या वादावर सावध प्रतिक्रिया दिली.

जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींची निवडणूक भाजप, ताराराणी आघाडी, ताराराणी पक्ष, जनसुराज्य पक्ष आणि प्रकाश आवाडे एकत्रित लढवणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री (Higher and Technical Education Minister) चंद्रकांत पाटीलयांनी केली आहे. बैठकीत 300 पेक्षा जास्त गावांमध्ये थेट सरपंच व्हावा, यादृष्टीने बैठक झाल्याचे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

सावध प्रतिक्रिया :राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल अवमान केल्याने राज्यात संतप्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मंत्री पाटील म्हणाले, कीराज्यपालांच्या मनात तशा भावना नसतील. म्हणून मी सकारात्मकपणे या विषयावर पडदा टाकण्याबाबत हात जोडून विनंती उदयनराजे भोसले यांना केली होती. उदयनराजे काही बोलले असतील, तर त्यावर मी बोलणार नाही. राज्यपालांच्या कारवाई संदर्भात केंद्राच्या निर्णयाबद्दल बोलण्याइतपतही मी मोठा नसल्याचे सांगत पाटील यांनी अधिक प्रतिक्रिया देणे (Chandrakant Patil reaction on governor statements) टाळले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, सुरेश हाळवणकर उपस्थित (Chandrakant Patil on controversy) होते.

प्रतिक्रिया देताना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील



सीमाप्रश्न समन्वयाने :दरम्यान, सीमावादावर बोलताना ते म्हणाले की, मी आणि शंभूराजे यांनी काल तासभर दिल्लीतील वकिलांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. ही केस ताकतीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही स्तराला जाऊन, बोलून सीमावाद संपणार नाही. हा लढा न्यायालयातच लढावा लागेल. मराठी भाषिक महाराष्ट्रात आले तर त्यांना सुविधा देता येईल का? याबाबत कायदेशीर बाबीवर चर्चा सुरू आहे. 800 हून अधिक गावे न्यायालयाच्या निर्णयानंतर जे देणार ते आधीच देता येईल का? यावर विचार सुरू (controversy over Maharashtra Karnataka border) आहे.

घोषणा दिशाभूल करणारी :हा दोन राष्ट्रांच्या संघर्षाचा विषय नसून कर्नाटक आणि महाराष्ट्र (Maharashtra Karnataka border )दोघांनी समन्वयांना हा प्रश्न सोडवला पाहिजे. या विषयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंतप्रधान आणि अमित शाहांशी बोलत असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी म्हैसाळ योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची घोषणा दिशाभूल करणारी असल्याची टीका केली आहे. याबाबत ते बोलताना म्हणाले, विलासराव जगताप ज्येष्ठ नेते असून त्यांच्याशी बोलणार आहे. तांत्रिक मंजुरीशिवाय दोन हजार कोटीचा निधी मंजूर होत नाही. म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणाच्या मंजुरीची कागदपत्रे मी तुम्हाला देईन.

ABOUT THE AUTHOR

...view details