महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 6, 2022, 4:24 PM IST

ETV Bharat / state

Kolhapur Gaganbawda Highway: कोल्हापूर गगनबावडा महामार्ग बनला मृत्यूचा सापळा!

कोल्हापूर गगनबावडा महामार्गाची (Kolhapur Gaganbawda Highway) अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. कोल्हापूर हुन गगनबावडाला जाण्यासाठी साधारणत: एक तास लागतो. मात्र या रस्त्यावरून आता जाण्यासाठी तब्बल अडीच ते तीन तास लागत आहेत. (bad condition of Kolhapur Gaganbawda Highway).

Kolhapur Gaganbawda Highway
कोल्हापूर गगनबावडा महामार्ग

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर आधीच मोठ्या प्रमाणात खड्डे असताना आता जिल्ह्यातील महामार्गाची अवस्था देखील वाईट झाली आहे. कोकणाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा कोल्हापूर-गगनबावडा या रस्त्यावरून (Kolhapur Gaganbawda Highway) रोज हजारो वाहने ये जा करत असतात. मात्र या रस्त्याची अवस्था एखाद्या दुर्गम खेडे गावाला जोडणाऱ्या रस्त्यापेक्षाही बिकट झाली आहे. (bad condition of Kolhapur Gaganbawda Highway). यामुळे या मार्गावर दररोज अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन चालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.

कोल्हापूर गगनबावडा महामार्ग

रस्ता स्टेट हायवेकडून नॅशनल हायवेकडे दिला: कोल्हापूर गगनबावडा हा मार्ग एकूण 54 किलोमीटरचा आहे. कोल्हापूर हुन गगनबावडाला जाण्यासाठी साधारणत: एक तास लागतो. मात्र या रस्त्यावरून आता जाण्यासाठी तब्बल अडीच ते तीन तास लागत आहेत. पूर्वी हा रस्ता स्टेट हायवेकडे होता मात्र तो आता नॅशनल हायवेकडे वर्ग करण्यात आला आहे. असे असून ही गेल्या अनेक वर्षापासून या महामार्गाची डागडुजी करण्यात आलेली नाही. यामुळे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details