महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 30, 2019, 11:31 AM IST

Updated : May 30, 2019, 2:08 PM IST

ETV Bharat / state

'या' माजी उपराष्ट्रपतींच्या चिरंजीवांची समाज जागृतीसाठी धडपड

माजी उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती यांचे चिरंजीव अरविंद जत्ती हे सध्या समाज जागृतीसाठी काम करत आहेत. अरविंद यांनी लिंगायत समाजाच्या समाज जागृतीसाठी आणि उन्नतीसाठी रथयात्रा काढून महाराष्ट्राचा दौरा सूरू केला

माजी उपराष्ट्रपतींच्या चिरंजीवांची समाज जागृतीसाठी धडपड

जालना- भारताचे माजी उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती यांचे चिरंजीव अरविंद जत्ती हे सध्या समाज जागृतीसाठी काम करत आहेत. अरविंद यांनी लिंगायत समाजाच्या समाज जागृतीसाठी आणि उन्नतीसाठी रथयात्रा काढून महाराष्ट्राचा दौरा सूरू केला आहे. अरविंद यांचे वडील माजी उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती यांनी 24 ऑगस्ट 1974 ते 11 फेब्रुवारी 1977 दरम्यान भारताचे उपराष्ट्रपती पद भूषवले होते.

माजी उपराष्ट्रपतींच्या चिरंजीवांची समाज जागृतीसाठी धडपड

लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांचा सामाजिक आणि धार्मिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून समाज जागृती करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. पुणे येथून 26 मे ला निघालेली ही महाराष्ट्र राज्यव्यापी संदेश यात्रा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून 16 जूनला कोल्हापूर येथे ती पूर्ण होणार आहे. यादरम्यान महाराष्ट्रभर फिरून लिंगायत समाजाच्या उत्थानासाठी आणि जनजागृतीसाठी अरविंद जत्ती हे प्रयत्न करत आहेत.

त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची पत्नी शारदा या देखील या यात्रेमध्ये त्यांच्यासोबत आहेत. बुधवारी ही यात्रा जालना शहरात आली होती. नूतन वसाहत भागात असलेल्या मन्मथ स्वामी मंदिरात समाज बांधवांसाठी जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रशेखर होनशूल(विजापूर), अविनाश भोसेकर, दिलीप खाकरे, विनोद वीर ,कैलास फुलारी, आदींची यावेळी उपस्थिती होती.

Last Updated : May 30, 2019, 2:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details