महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देव तारी त्याला कोण मारी.. कार चारवेळा पलटी होऊन झाडावर आदळली; दोघेही सुरक्षित

'देव तारी त्याला कोण मारी'. ज्याचे-त्याचे नशीब त्याला साथ देत असते. गाडीपुढे आलेला कुत्रा वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि गाडीने चार पलट्या घेतल्या. त्यानंतर गाडी झाडाला धडकून लटकली. मात्र, त्यांचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्यांच्या 5 वर्षाच्या मुलीला व त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

By

Published : Jun 19, 2019, 4:56 PM IST

Updated : Jun 19, 2019, 5:17 PM IST

अपघातग्रस्त कार

जालना - असे म्हणतात ना की, 'देव तारी त्याला कोण मारी'. ज्याचे-त्याचे नशीब त्याला साथ देत असते. याचाच प्रत्यय जालना जिल्ह्यातील एका वकीलाला आला. गाडीपुढे आलेला कुत्रा वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि गाडीने चार पलट्या घेतल्या. त्यानंतर गाडी झाडावर आदळली. मात्र, त्यांचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्यांच्या 5 वर्षाच्या मुलीला व त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

जाफराबाद येथील मयूर गौतम हे पेशाने वकील आहे. ते त्यांच्या कारने राजूरहून जालनाकडे चालले होते. त्यांच्यासोबत त्यांची 5 वर्षीय मुलगी देखील होती. घानेवाडी पाटीजवळ त्यांची कार आली असता त्यांच्या गाडीसमोर कुत्रा आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कारने 3 ते 4 पलट्या घेतल्या आणि गाडी एका झाडाला लटकली.

कारने तब्बल चार पलट्या घेतल्या असल्या तरी अपघातात दोघांनाही सुदैवाने मोठी इजा झाली नाही. मयूर गौतम व त्यांची 5 वर्षाची मुलगी दोघेही सुरक्षित आहेत. चंदनझिराच्या पोलिसांनी तत्काळ पोहचवून मदतकार्य केले.

Last Updated : Jun 19, 2019, 5:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details