महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 10, 2020, 7:21 PM IST

ETV Bharat / state

जळगाव : महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी सुनील खडके बिनविरोध

भाजपकडून सुनील खडके यांचे दोन अर्ज नगरसचिव सुनील गोराणे यांच्याकडे दाखल करण्यात आले. पहिल्या अर्जावर सूचक म्हणून नगरसेविका रेश्मा काळे, अनुमोदक म्हणून जितेंद्र मराठे तर दुसर्‍या अर्जावर सूचक म्हणून भगत बालाणी अनुमोदक म्हणून स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांची स्वाक्षरी आहे. खडके यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

जळगाव महानगरपालिका उपमहापौर न्यूज
जळगाव महानगरपालिका उपमहापौर न्यूज

जळगाव -महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडीसाठी भाजपचे सुनील खडके यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उद्या 11 रोजी उपमहापौर निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

हेही वाचा -बिहार निवडणूक : मुख्यमंत्री कोण हे पाहणे मनोरंजक होणार - राजकीय विश्लेषक उदय तानपाठक

उपमहापौर पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी आज 10 रोजी अंतिम मुदत होती. दरम्यान, भाजपकडून सुनील खडके यांचे दोन अर्ज नगरसचिव सुनील गोराणे यांच्याकडे दाखल करण्यात आले. पहिल्या अर्जावर सूचक म्हणून नगरसेविका रेश्मा काळे, अनुमोदक म्हणून जितेंद्र मराठे तर दुसर्‍या अर्जावर सूचक म्हणून भगत बालाणी अनुमोदक म्हणून स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांची स्वाक्षरी आहे. यावेळी महापौर भारती सोनवणे,भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी उपस्थित होते. दरम्यान, सुनील खडके यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

निवडीसाठी उद्या विशेष सभा

उपमहापौरपदाच्या निवडीसाठी उद्या (ता. 11) सकाळी 11 वाजता मनपाच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थित विशेष सभा होणार आहे. या सभेत उपमहापौर निवडीची घोषणा केली जाणार आहे.

हेही वाचा -पश्चिम घाटावर 'प्रकाशमान' होणारी बुरशी, पर्यावरणप्रेमींसाठी पर्वणी

ABOUT THE AUTHOR

...view details