महाराष्ट्र

maharashtra

जळगाव : दहा दुचाकीसह दोन चोरटे पिंपळगाव पोलिसांच्या ताब्यात

By

Published : Feb 1, 2021, 3:08 PM IST

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने दुचाकी चोरणाऱ्या दोन संशयितांना अटक केली आहे.

जप्त वाहनांसह पोलीस पथक
जप्त वाहनांसह पोलीस पथक

जळगाव -जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने दुचाकी चोरणाऱ्या दोन संशयितांना अटक केली आहे. दोघांकडून चोरीच्या 10 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहे.

पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक निता कायटे यांना दाखल गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक निता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रात्री 10 वाजता संशयित आरोपी गणेश बाबुलाल परदेशी (वय 42 वर्षे) आणि अंकुश भिमराव मरसाडे (वय 23 वर्षे, दोघे रा. जंगिपूरा ता. जामनेर) दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. दोघांना खाक्या दाखविताच त्यांनी दहा चोरीच्या दुचाकींची चोरी केल्याचे कबुल केले.

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशान्वये प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक निता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निवृत्ती मोरे, रणजीत पाटील, पोलीस नाईक अरूण राजपूत, रविंद्रसिंग पाटील, संदीप राजपूत, चालक पोलीस नाईक सचिन वाघ यांनी कारवाई केली.

हेही वाचा -सोन्यावरील एक्साईज ड्युटी कमी करावी; सोने व्यावसायिकांची अपेक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details