जळगाव- आता जळगावकर रात्रीसुद्धा उड्डाण आणि लँडिंग करू शकणार आहेत. जळगाव विमानतळाचे लायसन्स हे 3 सी व्हीएफआर श्रेणीमधून 3 सी ऑल वेदर ऑपरेशन्स (आयएफआर - नॉन प्रिसिशन अप्रोच रनवे) श्रेणीमध्ये रूपांतरित झालेले आहे. त्यामुळे आता जळगाव विमानतळावरून रात्रीसुद्धा विमान हे उड्डाण आणि लँडिंग करू शकणार आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून जळगाव विमानतळावरून विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. परंतु, खराब हवामान किंवा कमी सूर्यप्रकाशामुळे अनेकदा विमान फेऱ्या रद्द होत होत्या. यावर उपाय म्हणून नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदारांसह सर्व नेते, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे प्रयत्न सुरू होते. खराब हवामानामुळे अनेकदा विमान सेवेत बाधा निर्माण होत होत्या. जळगाव विमानतळाचे अरोड्रोम लायसन्स हे 3 सी व्हीएफआर श्रेणीमधून 3 सी ऑल वेदर ऑपरेशन्स (आयएफआर - नॉन प्रिसिशन अप्रोच रनवे) श्रेणीमध्ये रूपांतरित झालेले आहे.