महाराष्ट्र

maharashtra

जळगाव : गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदारांचे जयंत पाटलांना साकडे

By

Published : Feb 14, 2021, 3:36 PM IST

महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे कराराची मुदत संपली आहे. मनपाने गाळे ताब्यात घेत लिलाव करण्याची भूमिका घेतली आहे. याच व्यापारी गाळ्यांवर लाखो कुटुंब अवलंबून आहेत. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी डॉ. गुरुमुख जगवाणी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

former-mla-request-to-jayant-patil-to-solve-the-issue-of-shop-owner
जळगाव : गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदारांचे जयंत पाटलांना साकडे

जळगाव -शहरासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे कराराची मुदत संपली आहे. परंतु शासनाचे धोरण ठरत नसल्याने पुढील दिशा अद्याप निश्चित होत नाही. या संदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे जिल्ह्यात आले असता, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांनी गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्याची त्यांच्याकडे मागणी केली.

गाळ्यांचा करार संपुष्टात -

जळगाव महानगरपालिकेसह राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या मालकीच्या गाळ्यांचा करार संपुष्टात आला असून मनपाने गाळे ताब्यात घेत लिलाव करण्याची भूमिका घेतली आहे. जळगाव शहरासह राज्यातील लाखो कुटुंबांचा संसार याच व्यापारी गाळ्यांवर अवलंबून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर कोणतेही ठोस धोरण निश्चित केले जात नसल्याने आजपर्यंत त्यावर तोडगा निघालेला नाही. गाळेधारकांवर अन्याय होऊ नये, यासाठी महाआघाडी सरकारच्या काळात लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली.

लवकरच मंत्रालयात बैठक घेऊ-

जयंत पाटील यांनी याविषयी निर्णय घेण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. डॉ. जगवाणी यांची चर्चा सुरू असताना माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, आमदार किशोर पाटील, माजी खासदार मनीष जैन, माजी आमदार राजीव देशमुख यांनीदेखील सहभाग नोंदवत व्यापारी संकुलांचा प्रश्न गंभीर असून लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली.

हेही वाचा - देशात इंधन दरवाढीचा भडका, राज्यात पेट्रोल शतकाच्या उंबरठ्यावर

ABOUT THE AUTHOR

...view details