महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 2, 2020, 7:39 PM IST

ETV Bharat / state

महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम घरी राहूनच साजरा करण्याचे आवाहन

सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे सर्व सण उत्सव नागरिकांनी आतापर्यंत घरी थांबूनच पार पाडले आहेत. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यादिवशी चैत्य भूमीवरुन थेट प्रक्षेपण होणार आहे. त्यामुळे अनुयायांनी घरी थांबूनच बाबासाहेबांना अभिवादन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Dr. Babasaheb Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जळगाव- कोरोनाच्या काळाचा विचार करता यावर्षी ६डिसेंबर, २०२०रोजी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

राज्यात तसेच जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणावर आढळून येत असल्याने चालू वर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेता गेल्या सात-आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण/उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केलेले आहेत. त्यामुळे कोविड पार्श्वभूमीवर, यावर्षी डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचा ६ डिसेंबर, २०२० रोजी चैत्यभूमी दादर येथील महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने जळगाव जिल्ह्यातील सर्व अनुयायांनी चैत्यभूमी दादर येथे न जाता घरातूनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.

हेही वाचा - फायजर बायोटेक : इंग्लंडमध्ये पुढील आठवड्यात लस होणार उपलब्ध, सरकारची मंजूरी

महापरिनिर्वाण दिवस भारतीयांसाठी दुःखाचा

महापरिनिर्वाण दिन हा दिवस भारतीयांसाठी दु:खाचा गांभिर्याने पालन करावयाचा असून परपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोविड संसर्गाचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी विचारपूर्वक व र्धेर्याने वागून जळगाव जिल्ह्यात/तालुक्यात महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम गर्दी न करता, घरी राहूनच अभिवादन करण्याचे सर्व अनुयायांना आवाहन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी केले आहे.

हेही वाचा - इंडोनेशियात कोरोनाच्या संसर्गाने 180 डॉक्टरांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details