महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 7, 2020, 9:28 AM IST

ETV Bharat / state

अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर मेगा ब्लाॅक; 9 दिवस रेल्वेचा खोळंबा

अकोला ते पूर्णा या रेल्वे मार्गावरील लिंबगाव ते मुदखेड दरम्यान रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. जवळपास नऊ दिवस हे काम चालण्याची शक्यता आहे. त्यासाठी काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यात. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत. तर काही रेल्वे उशिराने धावणार आहेत.

mega-block-on-akola-purna-railway-line-in-hingoli
अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर मेगा ब्लाॅक

हिंगोली- अकोला ते पूर्णा या रेल्वे मार्गावरील लिंबगाव ते मुदखेड दरम्यान रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. जवळपास नऊ दिवस हे काम चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे 6 ते 18 फेब्रुवारी दरम्यान या मार्गावरील काही रेल्वे गाड्या रद्द केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा-ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: भोगावती नदी वाळूप्रकरणी चौकशी पूर्ण; मात्र, अहवालात गौडबंगाल


मुदखेड ते परभणी दरम्यान 81.83 किमीचे दुहेरीकरणाचे कार्य पूर्णत्वास गेले आहे. तसेच या भागातील परभणी ते मीरखेल, लिंबगाव ते मुदखेड दरम्यान काम पूर्ण झाले आहे. तर लिंबगाव-चुडावा, पूर्णा-मीरखेड दरम्यान 31.96 किमी चे काम सुरू आहे. या मार्गावर रेल्वेरुळ जोडण्यासाठी 9 दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यासाठी काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यात. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत. तर काही रेल्वे उशिराने धावणार आहेत.

या आहेत रद्द केलेल्या गाड्या
7 फेब्रुवारी रोजी गाडी क्रमांक 17641 आणि 17642 नांदेड वसमत नांदेड दरम्यान रद्द केली आहे. 57540 ही गाडी परळी ते अकोला 75 मिनिट उशिरा धावणार आहे. तर 8 फेब्रुवारीला गाडी क्रमांक 57222 पूर्णा ते परळी व 57521 परळी ते पूर्णा ही रेल्वे पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. तर काही रेल्वे ह्या एका स्टेशन पासून दुसऱ्या रेल्वे स्थानकापार्यंत धावणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details