महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री सभास्थळी पोहचले ३ तास उशीराने, काँग्रेसवर केली सडकून टीका

मुख्यमंत्र्याची सभा १२ वाजून ३० मिनिटांनी होणार होती. सकाळपासूनच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, बराच वेळ होऊन देखील मुख्यमंत्री सभेसाठी आले नाहीत.

By

Published : Apr 13, 2019, 8:28 AM IST

हिंगोली सभा

हिंगोली - जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा होती. या सभेत मुख्यमंत्री सभास्थळी ३ तास उशिराने पोहोचले. उशिराने मुख्यमंत्री आल्याने आयोजकांवर खुर्च्या गुंडाळून ठेवण्याची वेळ आल्याचे चित्र पहायला मिळाले.

हिंगोली मुख्यंत्र्यांची जाहीर सभा

मुख्यमंत्र्याची सभा १२ वाजून ३० मिनिटांनी होणार होती. सकाळपासूनच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, बराच वेळ होऊन देखील मुख्यमंत्री सभेसाठी आले नाहीत. यामुळे तहानेने व भुकेने व्याकूळ झालेली जनता सभेतून निघून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर दिसले त्यावेळी मंडपात बसलेले होते ते जाग्यावरच बसून राहिले.

मुख्यमंत्री आल्यानंतर महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांचे भाषण झाले. नंतर मुख्यमंत्र्याच्या भाषणास सुरुवात झाली. त्यांनी काँगेसच्या '७२ हजार गरीबीवर वार' या घोषवाक्यावर टीका केली. अर्थमंत्री चिदंबरम यांना पत्रकाराने विचारले, तुम्ही जनतेला ७२ हजार कसे देणार, तिजोरीत आलेल्या रक्कमेतून जनतेला ७२ हजार देणार असल्याचे चिदंबरम यांनी सांगत त्यांची खिल्ली उडवली. अरे वारे वा या ठिकाणी मोदींनी काळ्या पैशावर आघात करायचा अन काळा पैसा तिजोरीत जमा करायचा, अन तो पैसा तुम्ही वाटायचा मग तुम्ही कशाला मोदी आहेत ना, काँग्रेस पक्षाला नीती नाही, धोरण नाही, नियम नाही, केवळ आश्वासने देण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर केली.

आतापर्यंत काँग्रेस सरकारने काहीही केले नाही. तसेच गांधी घराण्यातील राहुल गांधी यांच्या घराण्यातील सर्वांचीच नावे घेत त्यांनीही आतापर्यंत काहीच केले नाही. तसेच राहुल गांधी देखील स्वतः काही करू शकत नाहीत. त्यांचे भाषण म्हणजे मनोरंजन असल्याची टीका मुख्यंत्र्यांनी केली. आता येथून पुढे एखाद्या जाहिरातीप्रमाणे राहुल गांधी यांचे भाषण हे काल्पनिक आहे, याचा कशाशीही संबंध नाही, असे होणार आहे. सभेसाठी पालकमंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details