महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 10, 2020, 7:30 PM IST

ETV Bharat / state

गोंदियात लॉकडाऊनमुळे मजुरांचे हाल; सामाजिक कार्यकर्त्याने केले मसाल्यांचे वाटप

जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक गुप्ता यांनी मजुरांना एक किलो तेल, मीठ, तिखट, हळद आदी मसाल्यांचे वाटप केले आहे. दरम्यान, लॉकडाऊन उठल्यावरही आपण गर्जूंना मदत करत राहू, असे अशोक गुप्ता यांनी सांगितले.

social worker help gondia
मसाला वाटप गोंदिया

गोंदिया- लॉकडाऊनमुळे मजुरी करून पोट भरणाऱ्यांचे हाल होत आहे. शासनाकडून मजुरांना तांदूळ, दाळ इतर धान्य दिले जात आहे. मात्र, तिखट, मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही. त्यामुळे, ही गरज जाणून जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक गुप्ता यांनी मजुरांना एक किलो तेल, मीठ, तिखट, हळद आदी मसाल्यांचे वाटप केले आहे. लॉकडाऊन उठल्यावरही आपण गर्जूंना मदत करत राहू, असे अशोक गुप्ता यांनी सांगितले.

माहिती देताना सामाजिक कार्यकर्ता अशोक गुप्ता

ABOUT THE AUTHOR

...view details