महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 22, 2019, 11:10 PM IST

Updated : Nov 22, 2019, 11:18 PM IST

ETV Bharat / state

गोंदिया जिल्ह्यात दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक; एक ठार, दोन जखमी

जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम खजरीजवळ दोन मोटारसायकलींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून दोन जखमी झाले आहेत.

अपघात

गोंदिया- जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम खजरीजवळ दोन मोटारसायकलींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून दोन जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

ग्राम खजरीजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक

या अपघातात तुळशीराम हगरू लंजे (वय ६७ रा. कोहळीटोला) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघातात तुळशीराम लंजे यांच्यासोबत सतीश भुमेश्वर कटरे (वय ३५ रा. सरांडी) व लोकेश कुसरंग येडे (वय २६ रा. रापेवाडा) होते. अपघातानंतर तिघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तुळशीराम लंजे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, सतीश व लोकेश यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Last Updated : Nov 22, 2019, 11:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details