महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 12, 2020, 7:27 PM IST

ETV Bharat / state

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचा गोंदियात रास्ता रोको; वाहतूक विस्कळित

कोरोना महामारी आणि टाळेबंदीमुळे उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने केलेली इंधन दरवाढ चुकीची असल्याचे मत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

शिवसेनेचा गोंदियात रास्ता रोको
शिवसेनेचा गोंदियात रास्ता रोको

गोंदिया - पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आणि दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोंदियात आज दुपारी उड्डाणपुलाजवळ शिवसेनेच्या रास्ता रोको आंदोलन केले यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शिवसेनेने रस्ता रोखून धरल्यामुळे काही काळ शहरातील वाहतुक खोळंबली होती.


कोरोना महामारी आणि टाळेबंदीमुळे उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने केलेली इंधन दरवाढ चुकीची आहे. भाजप सरकारला आश्वासनांचा विसर पडला आहे. केंद्रातील भाजप सरकारने सत्तेत येण्याअगोदर पेट्रोल, डिझेल दरवाढीचा प्रमुख मुद्दा प्रचारात आघाडीवर ठेवला होता. मात्र, भाजपची सलग दोन वेळा देशात सत्ता येऊनही नागरिकांना 'अच्छे दिन' पहायला मिळाले नाहीत.

हेही वाचा-औरंगाबादचा पाणीप्रश्न लवकरच सोडवू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

इंधनवाढ म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळणे-

टाळेबंदीत शिथिलता आणल्याने वाहनांचा वापर होऊन पेट्रोल व डिझेलची विक्री पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, गेले १५ ते २० दिवस सातत्याने पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत आहे. कोरोनाचे संकट देशावर असताना व आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या नागरिकांना इंधन दरवाढ म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे यांनी केली आहे.

दरम्यान, कोल्हापूर, यवतमाळसह राज्यभरात शिवसेनेने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले आहे.

हेही वाचा-अन् शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मुश्रीफांना अश्रू अनावर..!

ABOUT THE AUTHOR

...view details