महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 21, 2019, 1:57 PM IST

ETV Bharat / state

साक्रीतील 'त्या' बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभाग अपयशी, शेतकरी संतप्त

साक्री परिसरात धुमाकूळ माजवत असलेला बिबट्या मंगळवारी पाण्याच्या शोधात असताना एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडला. त्याने याबाबत वनविभागाला माहिती देवून बोलावले. मात्र, वनविभागाने बिबट्यास जेरबंद करण्यात असमर्थता दाखवत त्यास तिथेच शेतात सोडून दिल्याने बिबट्या परिसरातच पळाला. यामुळे शेतकरी संतापले आहेत.

बिबट्याला जेरबंद वनविभागाला अपयश

धुळे -जिल्ह्यातील साक्री परिसरात बिबट्याचा सर्रास वावर सुरूच असून बिबट्याने शेतकऱ्यांना अक्षरशः त्रासून सोडले आहे. ४ ते ५ दिवसांपूर्वीच शेतातील जवळपास १०० बिबट्याने मेंढ्यांचा फडशा पाडून मेंढपालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. यातच, मंगळवारी पाण्याच्या शोधात असलेला हा बिबट्या परिसरातील एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडला. शेतकऱ्याने तत्काळ वनविभागास याविषयीची सूचना देऊन बिबट्यास विहिरीबाहेर काढून जेरबंद करण्याची विनंती केली. मात्र, वनविभागाने बिबट्यास जेरबंद करण्यात असमर्थता दाखवत त्यास तिथेच शेतात सोडून दिल्याने बिबट्या परिसरातच पळाला. यामुळे शेतकरी संतापले आहेत.

बिबट्याला जेरबंद वनविभागाला अपयश

साक्री परिसरात ४ ते ५ दिवसांपूर्वीच शेतातील जवळ-जवळ १०० मेंढ्यांचा बिबट्याने फडशा पाडला होता. त्याआधी देखील याच परिसरात पोल्ट्री फार्मच्या आजू बाजूने बिबट्या जाळीला धडशा देत असल्याचे तेथील सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आले होते. या बिबट्याच्या धसक्यामुळे येथील जवळपास ५०० कोंबड्या दगावल्याने व्यावसायिकाचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. तर, वनविभागाकडे वारंवार बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करून देखील वनविभाग त्याकडे जाणून बुजून काना डोळा करत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा -जागा नावावर करून देण्यासाठी लाच मागणार्‍या सरपंचाला अटक

यातच मंगळवारी पाण्याच्या शोधात असलेला हा बिबट्या परिसरातील एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडला. शेतकऱ्याने वनविभागास याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढले. परंतु, त्या बिबट्यास जेरबंद करण्यात असमर्थता दाखवत अधिकाऱ्यांनी त्यास तिथेच शेतात सोडून दिले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये वनविभागविषयी अत्यंत संतापाची भावना असून गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. तर, हा व बिबट्या परिसरातच पळाला असल्याने वनविभागास शेतकऱ्यांना बिबट्यापासून होणाऱ्या त्रासाचे काहीच स्वैर सुतक नाही आहे का असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

हेही वाचा - मोबाईल ठरतोय महिला आणि पुरुषातील वादाचे कारण, जागतिक पुरुष दिनानिमित्त विशेष आढावा

ABOUT THE AUTHOR

...view details