महाराष्ट्र

maharashtra

चंद्रपूरमधील झी बाजाराला भीषण आग; कोट्यवधीचे नुकसान

By

Published : Jan 20, 2020, 10:50 AM IST

मध्यरात्री २.३० वाजता लागलेली आग पहाटे ६ वाजेपर्यत चालूच होती. आग विझवण्यासाठी अग्नी शामक दलाचे अंदाजे १७ गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या होत्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग्निशामक दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज लावल्या जात आहे.

chandrapur
आग लागल्याचे दृश्य

चंद्रपूर- शहरातील झी बाजारात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल मध्यरात्री २.३० च्या सुमारास घडली. आगीत बाजारामध्ये असलेले सर्व प्लास्टिक, कपडे, खेळणी व इत्यादी साहित्य जळून खाक झालेत. आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.

आग लागल्याचे दृश्य

मध्यरात्री २.३० वाजता लागली आग पहाटे ६ वाजेपर्यत चालूच होती. आग विझवण्यासाठी अग्नी शामक दलाचे अंदाजे १७ गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या होत्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग्निशामक दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज लावल्या जात आहे. आग लागण्याच्या इतर कारणाबाबतही चौकशी करण्यात येणार आहेत. यावेळी महानगर पालिका अभियंता महेश बारई, स्थानिक नगरसेवक, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवन्त नादेडकर, पोलीस निरीक्षक बहादुरे उपस्थित होते.

हेही वाचा-मानवी तस्करी प्रकरणात मोठे यश, टोळीची मुख्य सूत्रधार 'सपना शूटर' गजाआड

ABOUT THE AUTHOR

...view details