महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 7, 2020, 3:39 PM IST

ETV Bharat / state

भंगाराम तळोधीत दारूचा महापूर; राजकीय व्यक्ती दारूविक्री करत असल्याची चर्चा

भंगाराम तळोधीत दारूचा महापूर
भंगाराम तळोधीत दारूचा महापूर

चंद्रपूर :जिल्ह्यात नाममात्र दारूबंदी उरली आहे. दारूबंदी उठविण्याचा हालचालींना वेग आलेला असतानाच तेलंगाणा सीमेलगत असलेल्या भंगाराम तळोधी परिसरात मोठ्या प्रमाणात दारूविक्री सुरू आहे. तर, दारूविक्रेता राजकीय व्यक्ती असल्याची चर्चा आहे. गोंडपिपरी शहरातही रात्रीच्या वेळेस खुलेआम दारूविक्री केली जाते. दारूविक्रीसाठी शालेय विध्यार्थांचा वापर होत असल्याची चर्चाही शहरात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाली अन अवैध मार्गाने दारू तस्करी करणाऱ्यांनी हातपाय पसरले. गोंडपिपरी तालुका याला अपवाद होता, आता मात्र तालुक्यातील अनेक गावात दारू सहज उपलब्ध होत आहे. तालुक्यातील भंगाराम तळोधी परिसरात मोठ्या प्रमाणात दारूविक्री सुरू आहे. या परिसराला तेलंगणाची सीमा लागलेली आहे. वर्धा नदीचा पात्रातून तेलंगणातील दारू गोंडपिपरी तालुक्यात येते. अशात राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एका नेत्याने भंगाराम तळोधी परिसरात दारूविक्रीचे जाळे पसरले. देशी, विदेशी दारू येथे सहज उपलब्ध होत आहे. धनिकांना घरपोच महागड्या दारूचा पुरवठा हा नेता करतोय, अशी चर्चा परिसरात आहे. विशेष म्हणजे दारूचा पुरवठा करण्यासाठी शालेय विध्यार्थांचा वापर होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

दुसरीकडे गोंडपिपरी शहरात रात्रीच्या वेळेस चौकातच देशी दारूची विक्री केली जात आहे. दारूबंदीनंतर गोंडपिपरी तालुक्यात दारूबंदीची कठोर अंमलबजावणी केली गेली. आता मात्र घरपोच दारू उपलब्ध होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

नदी पात्रातून दारूची वाहतूक

गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणाची सीमा लागलेली आहे. वर्धा नदीचा पात्राने महाराष्ट्र-तेलंगणाला विभागले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. नदी दुथडी भरुन वाहत आहे. मात्र, अशाही स्थितीत नावेने दारूची तस्करी सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details