महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एसटी बसने महिलेला चिरडले, संतप्त गावकऱ्यांचा ५ तास रास्ता रोको

अकोल्यावरून शेगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने जवळा फाट्यावर रस्ता ओलांडणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेला चिरडल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर स्पीड ब्रेकर व्हावे, या मागणीसाठी प्रेतासह पाच तास रास्ता रोको आंदोलन केले.

By

Published : May 10, 2019, 3:17 AM IST

woman dead

बुलडाणा - अकोल्यावरून शेगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने जवळा फाट्यावर रस्ता ओलांडणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेला चिरडल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर स्पीड ब्रेकर व्हावे, या मागणीसाठी प्रेतासह पाच तास रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तर दुसरीकडे गावकऱ्यांनी पोलिसांच्या गाडीच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे.

woman dead

गुरुवारी सकाळी छाया संदीप मसणे वय २८ ही महिला जवळा बुद्रुक या गावावरून शेगावकडे जाण्यासाठी जवळा फाट्यावर आली आणि या ठिकाणी रस्ता ओलांडत असताना अकोल्यावरून शेगावकडे भरधाव वेगाने जाणारी एम एच ४० एन ९९७२ या क्रमांकाची एस टी बस ने सदर महिलेला चिरडले या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात मिळताच गावकऱ्यांनी जवळा फाटा गाठून महिलेच्याप्रेतासह रस्ता रोको आंदोलन छेडले.

दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहोचले. दरम्यान संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. गाडीची काच फोडण्यात आली. घटनेचे गांभीर्य पाहता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची माहिती नागरिकांनी दिली. दरम्यान माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी घटनास्थळावर भेट देऊन आंदोलन कर्त्यांशी चर्चा करून सार्वजनिक बांधकाम विभागाला तात्काळ ब्रेकर तयार करण्याबाबत सूचना केल्या. दुपारपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ब्रेकर उभारणीसाठी साहित्य पोहचले नव्हते. यामुळे शेगाव - बाळापूर राज्यमार्ग ५ तास बंद होता.

ABOUT THE AUTHOR

...view details