महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 19, 2019, 7:56 AM IST

Updated : Dec 19, 2019, 10:10 AM IST

ETV Bharat / state

बुलडाण्यात संवेदना प्रतिष्ठानच्यावतीने 100 पेक्षा जास्त वधु-वरांचा परिचय मेळावा

सामाजिक समन्वय साधून बौद्ध धर्माच्या उपवर-वधु मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचा परिचय व्हावा व त्यामधून मंगल परिणयाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी रविवारी संवेदना प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन करण्यात आले होते.

buldana
वधु-वरांचा परिचय मेळावा

बुलडाणा - सामाजिक समन्वय साधून बौद्ध धर्माच्या उपवर वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचा परिचय व्हावा व त्यामधून मंगल परिणयाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी रविवारी संवेदना प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. त्रिशरण चौक येथील सामाजिक न्याय भवनच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी एकूण 78 उपवर तर, 104 वधुंनी आपला परिचय दिला.

बुलडाण्यात संवेदना प्रतिष्ठानच्यावतीने 100 पेक्षा जास्त वधु-वरांचा परिचय मेळावा

हेही वाचा -विक्रोळीत शिवसेना पदाधिकारी शेखर जाधव यांच्यावर गोळीबार

उपवर वधु-वर परिचय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. माणिकराव गवई, उद्घाटक म्हणून सुरेश सरकटे, तर प्राचार्या सिमा लिंगायत व श्रीधर जाधव यांची प्रमुख उपस्थितीत होती. यावेळी मान्यवरांनी आप-आपले मनोगत व्यक्त करत संवेदना प्रतिष्ठानच्या नियोजनाबद्दल सकारात्मक मतं व्यक्त करुन आयोजकांचे अभिनंदन केले.

परिचय मेळाव्यात बुलडाणा जिल्ह्याचे तथा जिल्ह्याच्या बाहेरील उपवर वधुं-वरांनी उपस्थिती दर्शवून आप-आपले परिचय दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संवेदना प्रतिष्ठानचे अशोक दाभाडे, संजय जाधव, विजय क्षीरसागर, प्रा. लक्ष्मण कंकाळ, भिमराव इंगळे, चंद्रकांत आराख, नंदकिशोर खोडके, प्रभाकर गवई, केलाश मोरे, राजाराम गवई. प्रा. गोतम अंभोरे, संदीप मोरे, प्रशांत इंगळे, आशिष गवई, सुभाष झिने, केशव खंडारे, प्रकाश जाधव यांनी परिश्रम घेतले.

Last Updated : Dec 19, 2019, 10:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details