महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 10, 2021, 7:53 PM IST

Updated : Feb 12, 2021, 4:04 PM IST

ETV Bharat / state

योगा योगाने नांद्राकोळीत माजी सरपंचांची पत्नी झाली सरपंच

बुलडाणा जिल्ह्यातील नांद्रोकोळी गावात योगा योगाने माजी सरपंचांची पत्नी सरपंच झाली आहे. या गावात सरपंच पदासाठी ग्रामपंचायतमध्ये सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले होते

In Nandrakoli village, the wife of a former sarpanch became the sarpanch
योगा योगाने नांद्राकोळीत माजी सरपंचांची पत्नी झाली सरपंच

बुलडाणा -योग आला तर त्या योगाला कोणीच थांबू शकत नाही. योगा-योगाने जे शक्य झालं ते होतेच. असाच प्रत्यय बुलडाणा जिल्ह्यातील नाद्रकोळी गावात आला आहे. योगा-योगाने माजी सरपंचांच्याच पत्नी सरपंच झाल्या आहेत. यामुळे नाद्राकोळी ग्रामपंचायतीकडे सर्वाचे लक्ष वेधले गेले आहे.

योगा योगाने नांद्राकोळीत माजी सरपंचांची पत्नी झाली सरपंच

बुलडाणा तालुक्यात 15 ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच निवड मंगळवारी 9 फेब्रुवारीला करण्यात आली. त्यात नांद्राकोळी ग्रामपंचायतमध्ये सर्वसाधारण महिला राखीव असे आरक्षण सरपंच पदासाठी असल्याने माजी सरपंच संजय काळवाघे यांच्या पत्नी आशाबाई संजय काळवाघे व उपसरपंच पदी मनोज जाधव हे निवडून आले. यावेळी सरपंच, उपसरपंचांच्या समर्थकानी गावात जल्लोषात गुलाल अंगावर घेऊन मिरवणूक काढली.

15 ग्रामपंचायत सरपंचाच्या निवडणुकीत नाद्राकोळी ग्रामपंचायत ठरली केंद्र बिंदू -

9 फेब्रुवारी पासून 51 ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच यांची निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. 9,10 आणि 11 फेब्रुवारीला ही प्रक्रिया होत आहे. 9 फेब्रुवारीला 15 ग्रामपंचायतीच्या निवडणुक पार पाडली. यावेळी बुलडाणा तालुक्यातील नाद्राकोळी ही ग्रामपंचायत केंद्र बिंदू ठरली. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 11 सदस्यापैकी 7 सदस्यांच्या बळावर आशाबाई संजय काळवाघे व उपसरपंच पदी मनोज जाधव हे निवडून आले. विशेष म्हणजे माजी सरपंच असलेले संजय काळवाघे यांच्या पत्नी आशाबाई संजय काळवाघे यांना यावेळी योगा-योगाने सरपंच पद मिळाले.

असा जुळून आला सरपंच होण्यासाठी योग -

नांद्राकोळी ग्रामपंचायतमध्ये एकूण 11 सदस्य संख्या आहे. ग्रामविकास पॅनेलचे 7 आणि लोकशाही ग्रामविकास पॅनेलचे 4 सदस्य निवडून आले आहेत. सरपंचासाठी ग्रामविकास पॅनेलमधून 2 सदस्यांनी बंड पुकारले होते. त्यापैकी एक महिला सदस्यांनी सरपंच पदासाठी नामनिर्देशन भरले होते. मात्र, लोकशाही ग्रामविकास पॅनेलच्या 4 सदस्यांपैकी 2 सदस्यांनी ग्रामविकास पॅनेलला सरपंच आणि उपसरपंच पदासाठी पाठिंबा दिला. नांद्राकोळी ग्रामपंचायतमध्ये सर्वसाधारण महिला राखीव असल्याने माजी सरपंच संजय काळवाघे यांच्या पत्नी आशाबाई संजय काळवाघे या 7 सदस्यांच्या मताने योगा-योगाने सरपंच झाल्या.

Last Updated : Feb 12, 2021, 4:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details