महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 25, 2021, 12:11 PM IST

ETV Bharat / state

या कारणामुळे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातच रुग्ण घेवून पोहचली थेट रुग्णवाहिका

शुक्रवारी 23 एप्रिल रोजी सकाळपासून एका कोविड रुग्णाला ऑक्सिजनचा बेड मिळत नव्हता. त्यामुळे बुलडाणा शहरात सैरावैरा फिरणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकाने रुग्णवाहिका थेट बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली. यावरून कोरोना परिस्थिती किती गंभीर आहे हे दिसून येत आहे.

रुग्णवाहिका थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच
रुग्णवाहिका थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच

बुलडाणा- शुक्रवारी 23 एप्रिल रोजी सकाळपासून एका कोविड रुग्णाला ऑक्सिजनचा बेड मिळत नव्हता. त्यामुळे बुलडाणा शहरात सैरावैरा फिरणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकाने रुग्णवाहिका थेट बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली. यावेळी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व त्या वृद्ध महिलेला बुलडाण्याच्या स्त्री कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिला. यावरून कोरोना परिस्थिती किती गंभीर आहे हे दिसून येत आहे.

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातच रुग्ण घेवून पोहचली थेट रुग्णवाहिका

सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत मिळाले नाही ऑक्सिजन बेड

विदर्भ, खान्देश आणि मराठवाडा सीमेजवळ असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यामधील सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथील वयोवृद्ध अनुसयाबाई गवार या महिला रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, त्याठिकाणी रॅपिड टेस्ट केली मात्र ती निगेटिव्ह आली. मात्र त्या वृद्ध महिलेला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्याठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने त्यांना बुलडाणा येथे पाठवले, त्यामुळे शुक्रवारी सकाळी 11 वाजेपासून रुग्णांना घेवून रुग्णवाहिका बुलडाणा शहरात फिरत आहे, या दरम्यान साडेचार वाजेपर्यंत शासकीय व खाजगी 7 ते 8 रुग्णालये फिरले मात्र ऑक्सिजन बेड काही मिळाला नाही.

रुग्णवाहिका थेट जिल्हाधिकारी कार्यालयातनेताच प्रशासनात खळबळ

सकाळपासून शासकीय व खाजगी 7 ते 8 रुग्णालयात फिरले. परंतु, ऑक्सिजन बेड न मिळाल्याने शेवटी त्या रुग्णांचा नातेवाईकांनी रुग्णवाहिका थेट बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नेली. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली.

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर पोहचताच मिळाले ऑक्सिजन बेड

जिल्हाधिकारी कार्यालयात रुग्णवाहिका नेल्याची बाब स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांना कळताच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यांनी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी भूषण अहिरे यांच्याशी चर्चा करत त्या वृद्ध महिलेला बुलडाण्याच्या महिला कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिला. एवढेच नाही तर वृद्ध महिलेला भरती करेपर्यंत ते कोविड रुग्णालयात उपस्थित होते. तसेच रविकांत तुपकारांनी संपूर्ण महिला कोविड रुग्णालयात फेरफटका मारत सर्व परिस्थिती जाणून घेतली.

हेही वाचा -कोरोनाग्रस्त पतीने केली पत्नीची हत्या, गॅलरीत विलगिकरण केल्याचा राग अनावर

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details