महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चारचाकी चोराजवळ आढळले, देसी कट्टा अन् जिवंत काडतूस; २ वाहन जप्त

चोरी गेलेली चारचाकी गाडीचा शोध पोलिसांनी सुरू केला होता. या शोधात पोलिसाला या प्रकरणातील आरोपीकडे देशी कट्टा तसेच सहा जिवंत काडतूस आढळली. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

By

Published : Feb 14, 2019, 7:21 PM IST

पोलीस

भंडारा - शहरातून चोरी गेलेली चारचाकी गाडीचा शोध पोलिसांनी सुरू केला होता. या शोधात पोलिसाला या प्रकरणातील आरोपीकडे देशी कट्टा तसेच सहा जिवंत काडतूस आढळली. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी या आरोपीकडून २ चोरीचे वाहनही जप्त केले आहेत. सर्दूल सिंह उर्फ बलविंदर सिंग संधू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


भंडारा येथील संत कबीर वार्डातील रहिवासी गुणवंत तिडके याचे पिकअप मालवाहू वाहन आहे. त्यांचा चालक सुनील कुरंजेकर हा चारचाकी गाडी शहरातील बालाजी पेट्रोल पंपासमोर नेहमीप्रमाणे १५ जानेवारीला उभी करुन निघून गेला. त्या रात्रीला अज्ञात चोरांनी ती गाडी चोरून नेली. वाहन चोरी गेल्याचे लक्षात येताच गुणवंत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी तपास सुरू करून त्या क्षेत्रातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तेव्हा गाडी चोर एका गाडीतून येऊन ती गाडी चोरून नेल्याचे आढळून आले. त्यानंतर चोरीला गेलेले वाहन जरीपटका परिसरात उभी आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक यांना गोपनीय सूत्रानुसार मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत जरीपटका परिसरातून चोरीला गेलेली पिकअप ताब्यात घेतली. चोरट्यांनी वाहनाचे नंबरमध्ये बदल केला होता. पोलिसांनी पिकअप ताब्यात घेत असताना घटनास्थळाजवळ थोड्या अंतरावर आयशर कंपनीच्या वाहनात सर्दूल सिंग हा बसला होता. पिकअप वाहनाची तपासणी होत असतानाच त्याने तिथून पळ काढला. पोलिसांना त्याचा संशय येताच सर्दूल सिंगचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेत असताना त्याच्याजवळ देशी कट्टा सहा जिवंत काडतूस, तसेच विविध प्रकारच्या चाव्या आढळून आल्या. यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी सर्दूल सिंग हा मूळचा हिमाचल प्रदेशचा रहिवासी असून सध्या तो नागपूर येथे रेणू चौधरी ( सुमित नगर ) जरीपटका यांच्या घरी रहात असे. सर्दूल याचा सदुसिंग एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details