महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडाऱ्यातील लाखनी पोलिसांनी पकडला 4 लाखांचा गांजा; चौघांना अटक

छत्तीसगड राज्यातून अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या चौैघांना अटक करण्यात आली आहे. लाखनी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यात तब्बल पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

By

Published : Jul 23, 2019, 7:34 PM IST

चौघांना अटक

भंडारा- छत्तीसगडवरून आणलेला ४ लाख किमतीचा चाळीस किलो गांजा लाखनी पोलिसांनी पकडला आहे. या प्रकरणात ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन दुचाकीसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

लाखनी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल निराळे यांनी लाखनी पोलीस स्टेशनसमोर नाकाबंदी केली. छत्तीसगड राज्यातून विनानंबरच्या दोन दुचाकी येताना दिसल्या. या दुचाकींना थांबवून त्यावर बसलेल्या व्यक्तींची व मोटरसायकलची झडती घेतली. तर त्यामध्ये अंदाजे चाळीस किलो अमली पदार्थ गांजा पोलिसांच्या हाती लागला. या गांजाची अंदाजे किंमत चार लाख रुपये आहे. तसचे दोन मोटरसायकल पकडून असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या चारही आरोपींवर 164/ 2019 कलम 22 (ब) 22 एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details