महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 14, 2020, 9:48 AM IST

ETV Bharat / state

तरुणाचा हकनाक बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग.. खड्डे बुजवण्याचे काम सुरू

भंडाऱ्यात चार दिवस अगोदर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर मृतदेहासह आंदोलन करण्यात आले. यानंतर प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजवण्यासाठी डांबरी रस्त्याची निर्मिती केली जात आहे.

after-accidental-death-of-young-man-in-bhandara-the-work-of-road-was-started
शेवटी खड्डे बुजविण्याचे काम सुरू, मात्र या साठी एका तरुणाचा जीव जाण्याची वाट पाहावी लागली

भंडारा -चार दिवसांअगोदर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा मृत्यू झाला होता. तरुणाच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह घेऊन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर शेवटी रखडलेल्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. हा रस्ता सिमेंटचा रस्ता होणार आहे. मात्र, त्यासाठी बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्यासाठी डांबरी रस्त्यांची निर्मिती केली जात आहे.

शेवटी खड्डे बुजविण्याचे काम सुरू, मात्र या साठी एका तरुणाचा जीव जाण्याची वाट पाहावी लागली

भंडारा शहरातील जिल्हापरिषद चौकापासून नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यात पर्यंत नव्याने राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीला दोन वर्ष पूर्वी सुरुवात झाली. संपूर्ण महामार्ग जवळपास पूर्ण झाला. मात्र, भंडारा शहरातील रेल्वे फाटक ते बीएसएनएल ऑफिस पर्यंत 500 मीटरच्या रस्त्याच्या कामाला सुरुवातही केली गेली नव्हती. रस्त्यावरच्या वाहतुकीचा प्रमाण खूप जास्त असल्याने रस्ता हळू खराब व्हायला लागला मात्र हा राष्ट्रीय महामार्ग बनणार असल्यामुळे त्याचे खड्डे सुद्धा बुजविले गेले नाही. या राष्ट्रीय महामार्गासाठी लागणारी 24 मीटरची जागा इथे उपलब्ध नव्हती त्याचा दुष्परिणाम रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. मात्र, ना त्या रसत्याची डागडुजी झाली, नाही त्यावर बनणारा सिमेंटचा राष्ट्रीय महामार्ग बनला.

जिथे खड्ड्यांमुळे पायी चालणे कठीण होते तिथे लोक जीव धोक्यात घालून वाहतूक करत होते. चार दिवसा पूर्वी प्रशांत नवघरे हा तरुण स्वतःच्या दुचाकी गाडीने जात असताना खड्ड्यांमुळे खाली पडला आणि त्याच्या अंगावरून बस गेली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या मृत्यूमुळे संतापलेल्या नागरिकांनी आणि त्याच्या परिवाराने त्याचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन जात आंदोलन केले आणि रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. या आंदोलनानंतर कासवगतीने चालणाऱ्या प्रशासनाने त्वरित खड्डे बुजवण्यासाठी डांबरी रस्त्याची निर्मिती सुरू केली आहे. इथून बनणारा सिमेंटचा रस्ता अजून पुढच्या तीन-चार महिन्यात होण्याची शक्यता कमी आहे. कारण 24 मीटर चा रस्ता बनण्यासाठी आवश्यक असलेली जागा अधिग्रहण करून आणि असलेला अतिक्रमण काढून नंतरच हा रस्ता बनवला जाईल. या सर्व प्रक्रियेला अजून तरी कालावधी असल्याने या डांबरीकरणाच्या रस्त्यांची निर्मिती केली जात आहे. मात्र, या साठी एका तरुणाचा जीव जाण्याची का वाट पाहावी लागली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तात्पुरत्या स्वरूपात बनवला जाणारा हा डांबरी रस्ता खराब होण्याअगोदर येथे सिमेंटचा रस्ता व्हावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details