महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 26, 2021, 6:52 AM IST

ETV Bharat / state

बीड : सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे करणार मानवलोक संस्थेच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

मानवलोक मुख्यालय अंबाजोगाई येथे 100 बेड, बनेश्वर शिक्षण संस्थेचे महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा येथे 50 बेड, वसुंधरा विद्यालय घाटनांदूरच्या वतीने अल मुबारकी आयटीआय कॉलेज घाटनांदूर येथे 50 बेड असे एकूण 200 बेड असलेले तीनही सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत.

धनंजय मुंडे
Dhananjay munde

अंबाजोगाई (बीड) :सामाजिक कार्यात कायम अग्रेसर राहणाऱ्या अंबाजोगाई येथील मानवलोक संस्थेने अंबाजोगाई (100 बेड), बनसारोळा ता. केज (50 बेड) व घाटनांदूर ता. अंबाजोगाई (50 बेड) या तीन कोविड सेंटरची उभारणी केली आहे. या तीनही सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज (सोमवार) दुपारी 4 वाजता करण्यात येणार आहे.

मानवलोक मुख्यालय अंबाजोगाई येथे 100 बेड, बनेश्वर शिक्षण संस्थेचे महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा येथे 50 बेड, वसुंधरा विद्यालय घाटनांदूरच्या वतीने अल मुबारकी आयटीआय कॉलेज घाटनांदूर येथे 50 बेड असे एकूण 200 बेड असलेले तीनही सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी अनिकेत लोहिया, भागवतराव गोरे, गोविंदराव देशमुख, जी.जी. रांदड, डॉ. नरेंद्र काळे आदींनी परिश्रम घेतले आहेत.

या कार्यक्रमास आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, रा. कॉ. चे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शिवकन्याताई सिरसाट, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या वतीने अनिकेत लोहिया यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details