महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 30, 2021, 5:07 PM IST

ETV Bharat / state

कोरोना रुग्णांना व नातेवाईकांना दररोज एकवेळेसचे भोजन

आष्टी शहरात ट्रामाकेअर आणि आयटीआय असे एकूण दोन सेंटर अहेत. तर पाटोदा व शिरूर येथे प्रत्येकी एक असे एकूण तीन कोविड सेंटर आहे. यामध्ये दररोज अडीचशे ते तीनशे कोरोना रूग्णांना व नातेवाईकांना एक वेळेसचे जेवण भीमसेन धोंडे यांच्या वतीने देण्यात येत आहे.

जेवण वाटप
जेवण वाटप

आष्टी (बीड) -कोरोनाचा कहर झपाट्याने वाढत असल्यामुळे सरकारी व खासगी रूग्णालयात उपचारासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे शासनाने ठिकठिकाणी कोविड सेंटर सुरू केले आहे. सध्या आष्टी 100 रुग्ण (ट्रामाकेअर), पाटोदा (50), शिरूर (50) असे एकूण दोनशे रुग्ण या परिसरातून नातेवाईकांसह आलेले आहेत. त्यांना एक वेळेस जेवण देण्याची जबाबदारी माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी स्वीकारली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे कोरोना रूग्ण व नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या महिन्याभरापासून तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. आष्टी शहरात ट्रामाकेअर आणि आयटीआय असे एकूण दोन सेंटर अहेत. तर पाटोदा व शिरूर येथे प्रत्येकी एक असे एकूण तीन कोविड सेंटर आहे. यामध्ये दररोज अडीचशे ते तीनशे कोरोना रूग्णांना व नातेवाईकांना एक वेळेसचे जेवण भीमसेन धोंडे यांच्या वतीने देण्यात येत आहे.

कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. आपण करत असलेले कार्य खूप छोटे आहे. पण यामुळे जे वयोवृद्ध रूग्ण आहेत, त्यांच्याबरोबर आलेल्या रूग्णांनाही जेवण दिले जात आहे. तसेच जोपर्यंत कोरोनाचे सेंटर सुरू आहे, तोपर्यंत एक वेळेसचे जेवण आम्ही देणार असल्याचे भीमसेन धोंडे म्हणाले

ABOUT THE AUTHOR

...view details